saralgaon 
मुंबई

मुरबाड स्मशान भूमीचा प्रश्न एक महिन्यात मार्गी लागणार

नंदकिशोर मलबारी

सरळगांव (ठाणे) - मुरबाड तालुक्यातील जागे अभावी प्रलंबित राहिलेल्या कब्रस्तान व स्मशान भूमीचा प्रश्न एक महिन्यात मार्गी लागणार असे प्रतिपादन आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड येथील तहसिलदार कार्यालयात झालेल्या बैठकीत केले. 

गेली 35 वर्ष कब्रस्तान व स्मशान भूमिचा प्रश्न कोणीही मार्गी लावण्यासाठी  साधी चर्चाही केली नाही. जन्मलेल्या प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे. मृत्यू नंतरही त्याची परफड होऊ नये या साठी जातीभेद मनात न ठेवता हा प्रश्न मार्गी लागला पाहीजे असी संकल्पना आमदार कथोरे यांची असल्याने या साठी महसूल विभाग, वनविभाग, पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामसेवक व कब्रस्तान व स्मशान भूमि  प्रलंबित असलेल्या गावातील ग्रामस्थांची एक बैठक तहसिलदार सचिन चौधर यांनी आमदार किसन कथोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत केली होती. या वेळी तहसिलदार सचिन चौधर, उपमूख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) डी वाय जाधव, नायब तहसिलदार हनुमंत जगताप, जि.प सदश्य  सुभाष घरत, लियाकत शेख, नायब तहसीलदार  जाधव, गटविकास अधिकारी दोडके, सह बिडीओ अवचर प.स सभापती जनार्दन पादीर, उपसभापती सीमा घरत, मा.नगराध्यक्ष मोहन सासे, दिपक पवार, अनिल घरत उपस्थीत होते.  

मुरबाड तालुक्यात एकूण 125 ग्रामपंचायती आहेत.त्या पैकी  78 ग्रामपंचायतींना स्वताची जागा नसल्याने कब्रस्तान, दफनभूमी, स्मशान भूमि चा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक गावात या  प्रश्नावरून वादही झाले आहेत.  मात्र जात-पात याचा विचार न करणारे आमदार कथोरे यांनी जागा नसलेल्या ग्रामपंचायतिंना वनखात्याच्या जागा नियमात बसून जनसूविधा योजने अंतर्गत हा प्रश्न सोडविशाचा निर्णय घेतल्याने सर्वच समाजातून समाधान व्यक्त केला जात आहे. प्रलंबित ग्रामपंचायतीने सोमवार दि. 15 ऑक्टोबर पर्यंत 3/2 चा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या असून या कामात चालढकल करणा-या ग्रामसेवकांची गय केली जाणार नाही असा सज्जड दमही या बैठकीत देण्यात आला. 

या बैठकीचे प्रास्ताविक तहसीलदार चौधर यांनी केले तर सुत्रसंचालन नायब तहसीलदार हनुमंत जगताप  यांनी केले.

तालुक्यात एकही ग्रामपंचायत कब्रस्तान, स्मशान भूमि, दभनभूमी पासून वंचित राहू नये. निधीची कमतरता नसल्याने एकाही ग्रामपंचायतीच्या हद्दीत पत्र्याची शेड असलेल्या स्मशानभूमि मला अपेक्षित नाही. त्या आर सी सी च्या व्हाव्यात असी माझी मनापासून इच्छा असल्याने एकाही अधिका-यानी पत्र्याची स्मशान भूमि चा प्रस्ताव करू नये. किसन कथोरे,आमदार मुरबाड विधान सभा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VAIBHAV SURYAVANSHI: ११ चेंडूत अर्धशतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी फायनलमध्ये 'असा' झाला आऊट; नक्की काय घडलं?

ChatGPT मध्ये मोठं अपडेट! आता वेळेवर मिळणार सगळे अलर्ट; जाणून घ्या कसं काम करतंय हे फीचर? आहे तुमच्या फायद्याचं

नॅशनल हायवे अन् एक्सप्रेस वेवर हवामानानुसार बदलणार वेग मर्यादा; उल्लंघन केल्यास आपोआप ई-चलान

BEST Bus: 'नीट' परीक्षेसाठी 'बेस्ट'ची विशेष सेवा; २४ मार्गांवर ६० अतिरिक्त बसेस, दिवसभरात १८० फेऱ्यांचे नियोजन

Akole Leopard Attack: लेक किंचाळली अन् वडील धावले! बिबट्याच्या तावडीतून ४ वर्षीय अवनीची सुटका; अकोल्यातील थरारक घटना..

SCROLL FOR NEXT