file photo
file photo 
मुंबई

सीएए, एनआरसीमुळे दाखल्यांसाठी रांगा 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदणीचे पडसाद गुरुवारी (ता. 30) स्थायी समिती बैठकीत उमटले. केंद्र सरकारच्या या निर्णयांमुळे महापालिका विभाग कार्यालयांसमोर जन्म, मृत्यूच्या नोंदीसाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीचा दलाल गैरफायदा घेत असल्याचा आरोप सपचे नगरसेवक तथा आमदार रईस शेख यांनी केला.

गुरुवारी महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत सपचे रईस शेख यांनी हरकतीचा मुद्दा मांडून प्रशासनाचे लक्ष वेधले. या मुद्द्याशी सीएए, एनआरसी यांचा संबंध काय, असा सवाल भाजपने केला. विभाग कार्यालयांकडून जन्म, मृत्यूचे दाखले आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात होणाऱ्या दिरंगाईचा मुद्दा रईस शेख यांनी उपस्थित केला.

नोंद करून प्रमाणपत्र देण्यासाठी अधिकारी टाळाटाळ करत असल्याने नागरिकांना सहा महिने, वर्षभर प्रतीक्षा करावी लागते. वेळेवर प्रमाणपत्र मिळत नसल्याने अनेकांना समस्यांना तोंड द्यावे लागते. अधिकारी-कर्मचाऱ्यांची हलगर्जी, दुर्लक्षामुळे नारिकांना त्रास सहन करावा लागतो, असे ते म्हणाले.

सीएए, एनआरसी यांच्या भीतीने नागरिकांच्या विभाग कार्यालयांसमोर रांगा लागत आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे दलाल गैरफायदा घेत असल्याचा आरोप शेख यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे केला. कर्मचारी, अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणीही त्यांनी केली.

या मुद्याशी सीएए आणि एनआरसीचा काय संबंध, असा सवाल करत भाजपच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. ही स्थायी समिती आहे, समस्येवर बोला. जन्म, मृत्यूचे दाखले वेळेत मिळत नसल्याचा मुद्दा सत्य आहे. त्याच्याशी सीएए, एनआरसीचा संबंध जोडून राजकारण करू नये, असे भाजपच्या नगरसेवकांनी ठणकावले. 

मनुष्यबळ वाढवण्याचे निर्देश 
रईस शेख यांच्या मुद्याला कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठिंबा दिला; त्यामुळे सत्ताधारी आणि भाजप यांच्यात चांगलीच जुंपली. नागरिकांना जन्म, मृत्यूच्या नोंदी व प्रमाणपत्रे मिळण्यासाठी यापुढे विलंब लागू नये. त्यासाठी कर्मचारी-अधिकाऱ्यांची संख्या वाढवावी, असे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: रवींद्र वायकर अडचणीत? ठाकरे गटाने पाठवली नोटीस; नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : भाजप पक्ष माझ्यासोबत उभा आहे, म्हणूनच माझ्या मुलाला उमेदवारी मिळाली- ब्रिजभूषण सिंह

Hardik Pandya: हार्दिकला कसा मिळाला BCCI चा 'अ' श्रेणीचा करार? जय शाहांनी सांगितलं काय होती अट..

Narendra Dabholkar Case Live Updates: निकालाला इतकी वर्षे लागल्याने आम्ही अस्वस्थ होतो: पवार

Mumbai Local: "एक अबोल प्रेम कथा"; 'मुंबई लोकल' मध्ये झळकणार ज्ञानदा अन् प्रथमेश परब, पोस्टरनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT