rahul bajaj sakal
मुंबई

हमारा बजाजची जन्मकथा; बुलंद भारत की बुलंद तस्वीर

‘बुलंद भारत की बुलंद तस्वीर, हमारा बजाज!’ संपूर्ण देशाला भुरळ पाडणारी बजाजची ही जाहिरात आजही भारतीयांच्या मनात कायम आहे

विनोद राऊत

‘बुलंद भारत की बुलंद तस्वीर, हमारा बजाज!’ संपूर्ण देशाला भुरळ पाडणारी बजाजची ही जाहिरात आजही भारतीयांच्या मनात कायम आहे. बजाज ऑटोचे संस्थापक राहुल बजाज यांचे शनिवारी (ता. १२) निधन झाले. १९८९ मध्ये आलेली ही जाहिरात समाज माध्यमावर चांगलीच प्रसारित झाली. ही लोकप्रिय जाहिरात दिग्दर्शित केली ती शुमान्त्रो घोषाल यांनी. त्यानिमित्त शुमान्त्रो यांनी आठवणींना दिलेला उजाळा...

१९८० च्या दशकात जनरल मोटर्सने ‘शेव्रोले’ ही कार नव्याने बाजारात आणली होती. या कारसाठी जनरल मोटर्सने ‘हार्टबीट ऑफ अमेरिका’ या टॅगलाईनखाली एक मोठ्या जाहिरातीची कॅम्पेन हाती घेतली होती. ‘सर्वसामान्य अमेरिकन माणसाची कार’ असे या कॅम्पेनमधून मांडण्यात आले होते. राहुल बजाज यांना ही जाहिरात खूप आवडली. याच धर्तीवर ‘बजाज’चे कॅम्पेन करण्याच्या सूचना त्यांनी लिंटासला दिल्या. लिंटासने या जाहिरातीची जबाबदारी शुमान्त्रो घोषाल यांच्याकडे सोपवली. त्यांनी या जाहिरातीला अस्सल भारतीय स्वरूप दिले.

‘आम्हाला लिंटासकडून ही बजाजच्या जाहिरातीची आयडिया देण्यात आली, शिवाय त्यासाठी वेळही कमी दिला होता. त्याकाळात जाहिरात तयार करण्यासाठी फार पैसे मिळायचे नाहीत, तसेच त्यासाठी सुविधाही उपलब्ध नसायच्या. एका अमेरिकन जाहिरातीचे भारतीयीकरण करणे सोपे काम नव्हते. बजाजची स्कूटर मध्यमवर्गीयांसाठी तयार केली होती. त्यामुळे या जाहिरातीत कुठलाही अभिनेता किंवा नामांकित चेहरा घ्यायचा नाही, ही खूणगाठ बांधली. खरेतर बजाज समूहाकडे जाहिरातीसाठी मोठं बजेट होतं; मात्र ही जाहिरात खरी वाटावी म्हणून सर्वसामान्य चेहऱ्यांचा वापर केला. त्यामुळे ‘हमारा बजाज’ ही टॅगलाईन लोकांना भावली, ती सर्वांना आपली वाटली’, असे शुमान्त्रो म्हणतात.

कोणतीही जाहिरात बनताना संपूर्ण टीमचा सहभाग असतो. ही जाहिरात प्रत्यक्षात उतरवताना अनेकांचे मोलाचे योगदान होते. संगीतकार लुई बँक यांचा मोलाचा वाटा आहे, त्यासोबतच ‘हमारा बजाज’ ही टॅगलाईन लिहिणारे जयकृत रावत, सिनेमॅटोग्राफर बरुण मुखर्जी आणि गायक विनय मांडके यांच्यामुळे ही एक यादगार जाहिरात झाली; मात्र प्रत्यक्षात चित्रीकरण करताना ती एवढी लोकप्रिय होईल, याची कुठलीही कल्पना नव्हती. इतर जाहिरातीप्रमाणे आमच्यासाठी ही एक जाहिरात होती; मात्र ती जाहिरात टीव्हीवर झळकताच आम्हाला खूप फोन आलेत. खरंतर या जाहिरातीमुळे ‘बजाज’ उद्योग समूह घराघरांत पोहोचला. बजाजच्या स्कूटर विक्रीत या जाहिरातीचा मोठा वाटा आहे, असेही शुमान्त्रो यांनी सांगितले.

बजाजची स्कूटर ही केवळ बजाजची नव्हे, तर संपूर्ण देशाची आहे, असा संदेश ‘हमारा बजाज’ या कॅम्पेनमधून गेला. तिचे चित्रीकरणही तेवढेच जबरदस्त झाले. संपूर्ण देश या जाहिरातीच्या माध्यमातून जोडला गेला. शुमान्त्रो घोषाल यांच्या टीमला माझा सलाम आहे.

- पीयूष पांडे, प्रसिद्ध ॲडगुरू.

‘हमारा बजाज’ जाहिरातीमुळे जिंगल इंडस्ट्री मोठी झाली. अशोक पत्की यांच्याकडून मला खूप शिकायला मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनाचा मला ही जिंगल्स खूप उपयोग झाला. आतापर्यंत मी अनेक जिंगल्स, गाणी गायली; मात्र ‘हमारा बजाज’ अजूनही आठवणीत आहे.

- विनय मांडके, गायक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinnar Bus Stand Accident Video : नाशिकच्या सिन्नरमध्ये बसस्थानकातच भीषण अपघात; वेगात आलेली बस थेट फलाटवर उभ्या प्रवाशांमध्ये घुसली

StudyRoom Live Sessions: १२ वी नंतर स्पर्धा परीक्षांची तयारी कशी सुरू करावी? जाणून घ्या सकाळ+ स्टडीरूमचे खास लाईव्ह सेशनमध्ये

India Post App : रांगेत उभे राहण्याची गरज नाही! डाक विभागाचे 'डाक सेवा २.०' ॲप लॉन्च; सर्व टपाल सेवा आता एका क्लिकवर

Horoscope Prediction : उंदीर, वाघ की डुक्कर ! चायनीज ज्योतिषशास्त्रानुसार तुमची रास आणि स्वभाव घ्या जाणून

Yeola Election : येवला नगर परिषद निवडणुकीत मोठा ‘भूकंप’; ‘एबी फॉर्म’ न जोडल्याने नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाचे तब्बल ६९ अर्ज अवैध!

SCROLL FOR NEXT