Raigad  sakal
मुंबई

Raigad : बेलीवाडीतील बांधव अंधारातच!

विजेचा प्रश्‍न ऐरणीवर; रात्री-अपरात्रीचा प्रवास भीतीदायक

सकाळ वृत्तसेवा

मुरूड : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देशात अनेक स्थित्यंतरे झाली. रस्ते, वीज, पाण्यासारख्या मूलभूत सोयी खेडोपाडी वाड्या-वस्त्यांवर सरकारकडून पुरवण्यात आल्या; मात्र मुरूड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील बेलीवाडी या आदिवासीवाडीत स्वातंत्र्याचा प्रकाश न पडल्याने येथील बांधवांना अंधारातच चाचपडावे लागत आहे. अद्याप वीज पोहोचलेली नसल्याने येथील विजेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

उसरोली ग्रामपंचायतीपासून दोन किलोमीटर अंतरावर डोंगराळ भागात बेली आदिवासी कुटुंबे आपल्या परिवारासह अनेक वर्षे इथे वीजपुरवठ्याविना जीवन व्यतीत करत आहेत. ४५ घरांची मिळून १८० पर्यंत लोकसंख्या आहे.

आदिवासी समाज हा एकाजागी स्थिर राहू शकत नाही. वीटभट्टी वा उसतोडणीच्या कामी बाहेरगावीही स्थलांतरीत होत असतो. त्यामुळे या बेलीवाडीतील आदिवासी महिला-पुरुषांना रोजीरोटी लगतच्या मजगाव, नांदगाव, उसरोली या गावांच्या वेशीवर उदरनिर्वाहासाठी रोज जावे लागते. चार पैसे कमावल्यानंतर रात्री अपरात्री लेकरा बाळांसाठी पुन्हा बेलीवाडीला अंधार यात्रेतून परतावे लागते.

मुख्यतः हा दुर्गम भाग असल्याने जंगली श्वापदांसह सरपटणारे प्राण्यांचाही आदिवासी बांधवांच्या जीवाला धोका संभवतो. त्यामुळे या गंभीर समस्येकडे वीजवितरण कंपनीने लक्ष देणे गरजेचे आहे. आदिवासी वाडीवर तातडीने वीजपुरवठा करून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी इथल्या आदिवासी बांधवांना न्याय मिळवा, अशी मागणी आदिवासी समाज करत आहे.

अंगणवाडीची दैनावस्था

बेलीवाडीतील अंगणवाडीची झोपडी वजा चंद्रमौळी मोडकळीस आली आहे. एकाच खोलीत साहित्य आणि तिथेच अंगणवाडी भरवली जाते. वस्तुतः शौचालय, स्नानघर हे आवश्यक असूनही ते पुरवले गेले नाही. पंचायत समितीमार्फत अंगणवाडीचा प्रस्ताव पाठवल्याची माहिती मिळते; पण अद्याप या बालकांच्या डोक्यावर अंगणवाडीचे छप्पर अधांतरी आहे. नांदगावच्या फ्रेण्ड ऑफ चिल्ड्रन या स्वयंसेवी संस्थेने अंगणवाडी बांधून द्यायची तयारी दर्शवली आहे.

पंधरा दिवसांपूर्वी मुख्यालयाकडे बेलीवाडीचा वीजजोडणीचा प्रस्ताव पाठवला आहे. मार्च २०२३ अखेर बेलीवाडीवर वीजपुरवठा होईल.

- महादेव दातीर, कार्यकारी अधिकारी, मुरूड महावितरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs DC Live : सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, नमन धीरने मुंबई इंडियन्सची लाज वाचवली; दिल्लीच्या गोलंदाजांसमोर इतरांची शरणागती

Mumbai Crime: नवरा कामावरुन परतला, बायको दारुच्या नशेत तर्रर्र; मोहम्मद कुरेशीवर पत्नीचा चाकूहल्ला

Dindori : कार विहिरीत कोसळून ९ जणांचा मृत्यू; रस्त्याच्या मधोमध असलेली विहीर बुजवण्यास सुरुवात, मालकावर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : साखरी जवळी तामसवाडी गावाजवळ अपघात

IPL 2025 Marathi News: तिसऱ्यांदा चुकला तरी श्रेयस अय्यरवर होणार नाही बंदीची कारवाई, पण...; आयपीएलचा नवा नियम घ्या जाणून

SCROLL FOR NEXT