Police  Sakal
मुंबई

Raigad : दिघीच्या तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा

या दोघांनीही एकमेकांच्या संगनमताने १४ व्या वित्त आयोगाची मंजूर रक्कम व ग्रामनिधी असे मिळून ३ लाख ६८ हजार १२२ रुपयांचा चुकीच्या पद्धतीने खर्च करून अपहार केला.

सकाळ वृत्तसेवा

श्रीवर्धन - तालुक्यात दिघी ग्रामपंचायतीमध्ये १४ व्या वित्त आयोगाच्या तब्बल ३ लाख ६८ हजार १२२ रुपये निधी गैरव्यवहारप्रकरणी तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण उघड झाल्यानंतर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

श्रीवर्धन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांनी चौकशीअंती दिघी सागरी पोलिस ठाण्यात या कथित गैरव्यवहारप्रकरणी बुधवारी (ता. १२) तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी संशयित आरोपी तत्कालीन दिघी ग्रामपंचायत सरपंच सुमती चिकाटी व ग्रामसेवक डी. एच. गमरे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या दोघांनीही एकमेकांच्या संगनमताने १४ व्या वित्त आयोगाची मंजूर रक्कम व ग्रामनिधी असे मिळून ३ लाख ६८ हजार १२२ रुपयांचा चुकीच्या पद्धतीने खर्च करून अपहार केला. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दिघी सागरी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक डॉ. प्रसाद ढेबे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT