Corona Fight sakal media
मुंबई

रायगड जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने; कोरोना रुग्णसंख्या १० पेक्षा कमी

उपचाराधीन बाधितांची संख्याही घटली; आरोग्य विभागाला दिलासा

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : रायगड (Raigad) जिल्ह्यात कोरोनाचे दर दिवशी सरासरी आठ रुग्ण सापडत आहेत. ही साथ आता पूर्णत: नियंत्रणात येत असल्याने लवकरच जिल्ह्यात रुग्णसंख्या (corona patients) शून्य होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात केवळ १० बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे आरोग्य विभागाला दिलासा मिळाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी येत असल्याने जिल्ह्यातील निर्बंध (corona restrictions) हटवण्यात आले आहेत. सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरळीत सुरू झाले असल्याने येथील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी मास्क, हाताची स्वच्छता, सामाजिक अंतर पाळण्याच्या सूचना केल्या जात आहेत. कठोर निर्बंधांना वैतागलेल्या येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणही बहुतांश नागरिकांचे झाले असल्याने आरोग्य केंद्रासमोर रांगा दिसत नाहीत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी सांगितले की, रुग्ण संख्या कमी होत आहे. शून्य मृत्यूची स्थिती यापूर्वीच झाली आहे. मात्र असे असतानाही कोरोनाच्या त्रिसूत्रीचा वापर करून संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

लसीकरणावरील दृष्टिक्षेप

पहिला डोस- २२०५२१०
दुसरा डोस - १९६६०३१
मुलांचे लसीकरण- १५२६७२
१८-४४ वयोगटातील- ९०३३५४
४५-६० वयोगटातील-९०३३५४
६० च्या पुढील-५५११६७

रुग्ण संख्येवर दृष्टिक्षेप

नवे रुग्ण- ८
बाधित रुग्ण- १८३
उपचाराधिन रुग्ण- १०
एकूण मृत्यू - ४६९३
एकूण बाधित रुग्ण- २१४५९९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT