highway sakal
मुंबई

Raigad : महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे अपघातांत घट

इंदापूर-पोलादपूरदरम्यान चालकांना दिलासा; पोलिसांकडून उपाययोजनांवर भर

सकाळ वृत्तसेवा

महाड : मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर-पोलादपूरदरम्यान झालेले चौपदरीकरण, धोकादायक वळणे व अपघातस्थळांवर लावलेले सूचनाफलक, चालकांमध्ये नियम पालनाबाबत आलेली जागरूकता; तसेच महामार्ग पोलिसांतर्फे केलेल्‍या उपाययोजनांमुळे मृत्यूचा सापळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर ते पोलादपूरदरम्यान दोन वर्षांत अपघातांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे.

महामार्गाव आधी दिवसागणिक मार्गावर एक तरी अपघात घडतच असे. सरासरी १६०-१७० अपघात केवळ इंदापूर ते पोलादपूर या दरम्यान घडत होते. २००९ व २०१० या दोन वर्षांत ६४७ अपघात झाले होते. यामध्ये १७० जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

इंदापूर ते पोलादपूरदरम्यान महामार्ग विभागाने अपघात क्षेत्राच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुंदीकरण केले आहे. याच दरम्यान कशेळे, तळवली, महाड विसावा कॉर्नर, दासगाव खिंड, मोहप्रे येथील धोकादायक वळण, केंबुर्ली कॉर्नर, लोणेरे या धोकादायक ठिकाणी रुंदीकरण केले आहे. अनेक ठिकाणी समोरील वाहन नजरेस पडेल, अशी रस्त्याची रचना केली आहे. सेवा रस्ते व पदपथ तयार केल्याने पादचाऱ्‍‌यांनाही चालणे सोयीचे झाले. सुरक्षिततेसाठी बॅरिगेटर्स, रेडियमचे दिशादर्शक फलक लावले आहेत. या शिवाय वाहतूक नियम न पाळणाऱ्‍‌यांवर कारवाई केली जात असल्‍याने अपघात घटले आहेत.

वर्ष अपघात मृत्‍यू

२०२१ ३८ १७

२०२२ २१ १९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

IND vs SL 1st Test: लोकेश राहुलची पहिल्या कसोटीतून माघार? दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यास विलंब; नेमकं काय घडलं?

ICC 2027 World Cup Date: गांधी जयंतीला सुरू होतोय वर्ल्ड कप अन् फायनल...! नवीन फॉरमॅट, नवीन चुरस; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT