Oxygen
Oxygen esakal
मुंबई

'हा' जिल्हा बनला महाराष्ट्राची ऑक्सिजन राजधानी

दीनानाथ परब

रायगड: महाराष्ट्राने ऑक्सिजनच्या संकटावर जवळपास मात केली आहे. सद्य स्थितीमध्ये रायगड जिल्हा ऑक्सिजन उत्पादनाची राजधानी बनला आहे. मागच्या वर्षभरात रायगड जिल्ह्याने (Raigad district) ऑक्सिजन उत्पादनाची (oxygen production) क्षमता ४० टक्क्याने वाढवली आहे. सध्या दर दिवसाला रायगडमध्ये ६५० टन ऑक्सिजनचे उत्पादन सुरु आहे. रायगड जिल्ह्याला दर दिवसाला स्वत:ला ३० टन ऑक्सिजनची गरज लागते. (Raigad is now oxygen powerhouse of Maharashtra)

रायगड मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, बीड, जालना आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांची ऑक्सिजन गरज भागवत आहे. मुंबईला दर दिवसाला २४० टन ऑक्सिजनची गरज लागते. मोठ्या हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन टाक्या आहेत, त्यातून १८० टन ऑक्सिजन वापरला जातो. उर्वरित ६० टनांचा जम्बो आणि ड्युरा सिलिंडर्समधून पुरवठा होतो. रायगडमधुन हे सिलिंडर्स येतात.

पहिल्या लाटेच्यावेळी ४०० टन मेडिकल ऑक्सिजनचे उत्पादन करण्याची रायगडची क्षमता होती. आता ही क्षमता प्रतिदिन ६५० टनांपर्यंत वाढवण्यात आली आहे. आम्ही आधीपासून अस्तित्वात असलेल्या ऑक्सिजन प्लांटचेच उत्पादन वाढवलेले नाही, तर इंडस्ट्रीयल ऑक्सिजनचे वेगाने मेडिकल ऑक्सिजनमध्ये रुपांतर केले, असे रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यात पेण, डोळवी, माणगाव आणि तळाजो या भागात मुख्यत्वे ऑक्सिजन उत्पादन चालते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल मारहाणीप्रकरणी दिल्ली पोलीस अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी

IPL 2024 : 'तुम्ही मला अन् धोनीला शेवटच एकत्र खेळताना...' RCB vs CSK सामन्यापूर्वीच विराट कोहलीच्या वक्तव्याने उडाली खळबळ

NASA Mission : पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी NASAची ध्रुवीय प्रदेश मोहिम!

Super-Rich Club: जगातील अतिश्रीमंतांची संख्या वाढली; यादीत गौतम अदानींचे कमबॅक, नंबर एक वर कोण?

Mumbai Loksabha: मुंबईची लढत का आहे इतकी इंट्रेस्टींग? वाचा संपूर्ण आकडेवारी

SCROLL FOR NEXT