शेलू येथे मातीचा भराव वाहून गेला असून याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले.
शेलू येथे मातीचा भराव वाहून गेला असून याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. 
मुंबई

नेरळमध्‍ये वाहनचालकांना धोका

सकाळ वृत्तसेवा

नेरळ : कर्जत-नेरळ-कल्याण या राज्यमार्गावर १० किलोमीटर अंतरात डांबरीकरण करण्यात आले होते. शेलूनजीक या रस्त्यावरील मातीचा भराव वाहून गेल्यामुळे रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्‍यता वाढली आहे.

मुसळधार पावसामुळे कल्याण-नेरळ मार्गानजीक शेलू गावाच्या हद्दीत मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील मातीचा भराव वाहून गेला होता. त्यानंतर दोन दिवस रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. या भागातील कल्याण-नेरळ रस्त्यावरील मातीच्या भरावाचा मोठा भाग वाहून गेला. शेलूचे पोलिस पाटील मनोज पाटील यांनी २० दिवसांपूर्वीच ही माहिती नेरळ पोलिस ठाणे आणि कर्जत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली. परंतु, रस्त्याच्या डागडुजीसाठी अद्याप कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी चालकांना रस्त्याची दुरवस्था आणि तीव्र वळणाचा अंदाज न आल्यास नेरळकडून येणारी वाहने थेट शेतात जाऊन पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पोलिस पाटील मनोज पाटील यांनी सिमेंटच्या रिकाम्या पिशव्या मातीने भरून आणि पांढरा रंग लावून रस्त्याच्या धोकादायक झालेल्या भागात लावल्या होत्या. परंतु, सततच्या पावसाने या पिशव्या फाटून गेल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या ठिकाणी पुढे रस्त्याचा भाग वाहून गेल्याची माहिती देणारे फलक लावावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.  रात्रीच्या अंधारात चकाकणारी रेडियमची पट्टी त्या ठिकाणी लावल्यास चालकांना धोक्‍याची सूचना मिळू शकेल, असे पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Lok Sabha: उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT