रोहा-तळेखार रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत.
रोहा-तळेखार रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. 
मुंबई

रोहा-तळेखार मार्ग खडतर

सकाळ वृत्तसेवा

रोहा :  रोहा-तळेखार रस्त्याची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. अतिवृष्टीमुळे येथे रस्ताच वाहून गेला आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी वाहनचालकांसमवेत नागरिकांकडून होत आहे. 

अलिबाग- चणेरा-रोहा या सुमारे ५५ किलोमीटर लांबीच्या या रस्त्यापैकी तळेखार ते रोहा हा ३५ किलोमीटर लांबीचा रस्ता रोहा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. 
या रस्त्यावर चणेरा, खारगाव, आरे, गोफण, शेडसाई, चांदगाव आदी गावे आहेत. या गावांतील ग्रामस्थांना विविध कामांकरिता रोह्याला व अलिबागला ये-जा करावी लागते. तसेच बाजारहाट व सरकारी कामांसाठी रोहा हे तालुक्‍याचे, तर अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण गाठावे लागते. रुग्ण व विद्यार्थ्यांचे यामुळे हाल होतात.

या रस्त्यावर प्रवासाची सार्वजनिक साधने कमी असली तरी प्रवासी टमटमचा वापर अधिक करतात. तळेखार-रोहा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहने चालवणे धोकादायक झाले आहे. त्यामुळे रस्तादुरुस्तीची मागणी सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश वाडकर यांनी केली आहे. 

रोहा-तळेखार रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्तादुरुस्तीचे काम निविदा स्तरावर असून लवकरच रस्ता दुरुस्त करण्यात येणार आहे.
- अरुण देवकाते, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, रोहा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Viral Video: लिफ्टमध्येच कुत्र्याचा मुलीवर हल्ला, चावा घेताच...; पाहा अंगावर काटा आणणार व्हिडिओ

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

Latest Marathi News Live Update : केरळमध्ये हत्तीच्या हल्ल्यात मल्याळम वृत्तवाहिनीचा कॅमेरामन ठार

SCROLL FOR NEXT