वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावर धुरळ्यामुळे वाहनचालकांचे आरोग्‍य धोक्‍यात आले आहे.
वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावर धुरळ्यामुळे वाहनचालकांचे आरोग्‍य धोक्‍यात आले आहे.  
मुंबई

वाकण-खोपोली महामार्गावर धुळीतून प्रवास

सकाळ वृत्तसेवा

पाली : वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्ग ५४८ (अ) रुंदीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. ही कामे सुरू असताना येथील मार्गावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रवासी, वाहनचालक, व्यावसायिकांसह ग्रामस्थही हैराण झाले आहेत.

 या मार्गावर वाकण ते पाली, रासळ, वावे, चिवे, परळी, दुधानेवाडी, उंबरे, शेंबडी, मिरकुटवाडी ते पाली फाटा या ठिकाणी धुरळ्याची सर्वात अधिक समस्या आहे. मोटरसायकलस्वारांचे धुरळ्यामुळे हाल होत आहेत. या मार्गावरून जाताना दुचाकीस्वारांचा धुळीशी थेट संबंध येतो. हेल्मेट घातलेले असतानासुद्धा नाकतोंडात धूळ जाते. श्‍वसनाचे विकार असलेल्यांसह, लहान मुले व वृद्ध यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे; तर धुरळा उडत असल्याने समोरून ये-जा करणारी वाहने दिसत नसल्याने अपघातांच्या घटनांत वाढ झाली आहे. 

पावसाळ्यात महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी माती आणि खडीचा वापर केला होता. आता ऊन पडून व वाहने जावून येथून धूळ बाहेर उडत आहे. याचा त्रास वाहनचालक, दुचाकीस्वार व प्रवाशांना होत आहे. तसेच महामार्गाशेजारील दुकानदार, हॉटेल व्यावसायिक व रहिवासीदेखील धुळीमुळे त्रस्त झाले आहेत. हा धुरळा वाहनचालक आणि प्रवाशांच्या अंगावर सर्वत्र बसतो.

महामार्गाशेजारी जी दुकाने, हॉटेल आणि घरे आहेत; त्यांनादेखील या धुळीचा खूप त्रास सहन करावा लागतो. वारंवार उडणारी धूळ खाद्य पदार्थ आणि वस्तूंवरदेखील बसते. त्यामुळे सतत साफसफाई करावी लागते. हॉटेलमधील खाद्यपदार्थ, दुकानातील व घरातील वस्तू आणि उपकरणे धुळीमुळे खराब होतात. त्यामुळे या मार्गाचे काम जलद गतीने करण्याची मागणी व्यावसायिक, चालक व प्रवाशांकडून होत आहे.

धुरळ्यावर उपाययोजना करत आहोत. बुधवारपासूनच मार्गावर असलेले खड्डे खडी व डांबराने भरण्यास सुरू केले आहेत. त्यामुळे धुरळ्याची समस्या कमी होईल. लवकरच रस्त्याचा बराचसा भाग पूर्ण करणार आहोत.
सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी

या मार्गावर धुरळ्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. येथील धुरळ्याच्या समस्येवर काहीतरी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. 
प्रकाश मुद्राळे, प्रवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने दिल्लीला मिळवून दिलं पहिलं यश; सुनील नारायण स्वस्तात बाद

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT