नेरळ शहरात प्रचार करताना आमदार सुरेश लाड.
नेरळ शहरात प्रचार करताना आमदार सुरेश लाड.  
मुंबई

नेरळमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शक्‍तिप्रदर्शन 

सकाळ वृत्तसेवा

कर्जत: मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने महाआघाडीचे उमेदवार आमदार सुरेश लाड यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली. खोपोली, खालापूरनंतर गुरुवारी सायंकाळी आमदार लाड यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह नेरळ शहरातून भव्य प्रचारफेरी काढली. 

येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक नेते तथा माजी सरपंच भगवान चंचे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 25 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला; तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुरेश टोकरे यांच्या उपस्थितीत आमदार लाड यांनी ममदापूर, दामत येथे चौक सभा घेतल्या. 

नेरळ शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांनी प्रचार रॅलीस प्रारंभ केला. या वेळी शेकापचे नेते प्रवीण पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अशोक भोपतराव, नेरळ शहराध्यक्ष निकेश म्हसे, कॉंग्रेसचे नेते अरविंद कटारिया, तहसीन सय्यद, दिलीप गायकवाड, जावेदभाई, नंदू कोळंबे, जयेद नझे, जाकीर नझे, सुरेश चंचे, सोमा निरगुडा, झुगरे भाऊ, धाऊ उघडा, धनाजी गरुड, बाळा नाईक, जबीर नझे यांच्यासमवेत शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. या प्रचारफेरीत राष्ट्रवादी कॉंग्रेससह शेकाप, आरपीआय, मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT