कुष्ठरोग लागण झालेल्या वृद्धाला विशेष चप्पल दिली जाते.
कुष्ठरोग लागण झालेल्या वृद्धाला विशेष चप्पल दिली जाते.  
मुंबई

खालापूर तालुक्‍यात कुष्ठरोग रुग्ण वाढले

सकाळ वृत्तसेवा

खालापूर : खालापूर तालुका आजही आरोग्य सेवेबाबत मागासलेला आहे. खालापूर तालुक्‍यातील ग्रामीण व शहरी भागात २३ सप्टेंबर ते ९ ऑक्‍टोबर २०१९ पर्यंत कुष्ठरोग संयुक्त शोध अभियान राबविण्यात आले. यात ५ हजार ९२८ कुटुंबातील १ लाख ६० हजार ८३५ जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १६८ संशयित रुग्णांपैकी २३ रुग्णांना कुष्ठरोगाची लागण झाली आहे. पनवेल, कर्जतनंतर खालापूर तालुका कुष्ठरुग्णांच्या संख्येत तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या कुष्ठरोग शोध अभियानात संशयित रुग्ण शोधून त्याच्या तपासणीनंतर निदान झाल्यास उपचार करण्यात येतात. खालापूर तालुका आजही आरोग्य सेवेच्या बाबतीत मागासलेला आहे. तालुक्‍यात २०१६ मध्ये कुष्ठरोग शोध अभियानात २९ रुग्ण आढळले होते. यामध्ये सर्वाधिक महिला होत्या. या वेळी २९ पैकी सुमारे २२ महिलांना कुष्ठरोगाची लागण झाली होती. औषधोपचारानंतर सर्व रुग्ण शंभर टक्के बरे झाले आहेत. 

२०१७ मध्ये कुष्ठरोगी रुग्णांची संख्या २१ होती. या सर्व रुग्णांवर उपचारानंतर कुष्ठरोगापासून मुक्ती मिळाली आहे. २०१८ मध्ये तपासणी मोहिमेत पुन्हा रुग्ण संख्येत वाढ झाली होती. २०१८ मध्ये पुन्हा २९ कुष्ठरुग्ण आढळून आले होते. २०१९ मध्ये २३ सप्टेंबर ते ९ ऑक्‍टोबरपर्यंत कुष्ठरोग संयुक्त शोध अभियान खालापूर तालुक्‍यातील ग्रामीण व शहरी भागात राबविण्याते आले. यात ५ हजार ९२८ कुटुंबातील १ लाख ६० हजार ८३५ जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १६८ संशयित रुग्णांपैकी २३ रुग्णांना कुष्ठरोगाची लागण झाली आहे.

तपासणी मोहिमेत २८६ जणांचा सहभाग
मागासलेल्या वाडी, वस्तीवर कुष्ठरोगाचे रुग्ण आढळत आहेत. कुष्ठरोगांवर नियंत्रण आणण्यासाठी ॲलर्ट इंड्यिा संस्थेचे मोलाचे साह्य मिळते. आशा सेविका, स्वयंसेवक यांचे पथक तयार करण्यात आले आहे. खालापूर तालुक्‍यात चार प्राथमिक आरोग्य केंद्रे असून लोहप, चौक बोरगाव, वावोशी आणि खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १४० आशा सेविका आणि मदतीला एक स्वंयसेवक असे एकूण २८६ जण ग्रामीण व शहरी भागात तपासणी मोहिमेत होते. याशिवाय २९ पर्यवेक्षक, ६ वैद्यकीय अधिकारी, तालुकास्तरीय पर्यवेक्षक सामील होते.
 

कुष्ठरोग बरा होणारा असून अज्ञानापोटी रोग लपवला जातो. वर्ष ते सहा महिन्यांत रुग्ण पूर्णपणे औषधोपचाराने बरा होतो. खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दर गुरुवारी तपासणी आणि तज्ज्ञ डॉक्‍टर उपचार करतात.
- दिलीप घोडके, तंत्रज्ञ कुष्ठरोग अभियान, खालापूर


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT