नेरळः नेरळमध्ये विकास निधी आणण्यासाठी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला. पहिलीच ग्रामसभा असूनही सरपंच रावजी शिंगवा यांनी अनेक विषयांवर गावाच्या विकासाच्या दृष्टीने अनेक निर्णय घेतले. वारकरी भवनामध्ये झालेले अतिक्रमण काढून वारकरी भवन ताब्यात घेण्याचा तसेच कचराभूमीकडे जाणारा रस्ता बिलंदरने खुला न केल्यास विकसकाचा मार्ग अडविण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला.
नेरळ ग्रामपंचायतीची तहकूब ग्रामसभा आज सरपंच शिंगवे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी उपसरपंच शंकर घोडविंदे व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. घरपट्टी आणि पाणीपट्टी यामधील उत्पन्न यांचा गोषवारा वाचन ग्रामविकास अधिकारी आर. बी. गोसावी यांनी केले. कामगार पगार हा एकूण उत्पन्नाच्या 20 लाख जास्त आहे. त्यामुळे ती तूट कशी भरून काढता येईल, यावर ग्रामसभेत चर्चा झाली. गावाचा समावेश नेरळ विकास प्राधिकरणमध्ये असताना मागील अडीच वर्षांत कोणतीही कामे प्राधिकरणामधून घेण्यात आली नाहीत. त्या निधीमधून त्या वेळी अनेक ग्रामस्थांनी वेगवेगळी कामे सुचविली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिल्लक असलेला निधी नेरळ ग्रामपंचायतीसाठी मिळावा यासाठी एक शिष्टमंडळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटण्यास जाईल, असे शिंगवा यांनी सांगितले.
कचराभूमी हलविण्याची प्रक्रिया येत्या महिनाभरात पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले. ग्रामस्थांनी नवीन प्रस्तावित कचराभूमीकडे जाणारा रस्ता एका विकसकाने अडविला असून, तो तत्काळ खुला करावा, अशी मागणी केली. त्यावर शिंगवा यांनी आजच ग्रामपंचायत रस्ता खुला करेल, असे सांगितले. नेरळ वारकरी मंडळाच्या वारकरी मंदिराचा ताबा नेरळ ग्रामपंचायत घेणार असल्याचा ठरावही घेण्यात आला. त्यात त्या ठिकाणी आपल्या कुटुंबासह अतिक्रमण करून राहणाऱ्या अन्य गावातील व्यक्तीला बाहेर काढून ग्रामपंचायत चावी ताब्यात घेणार आहे. ग्रामपंचायतीच्या नावाची मालकी असलेल्या त्या समाज मंदिराच्या असेसमेंट उतारा यांचा दुरुपयोग केल्याप्रकरणी धर्मादाय आयुक्तांना कळविण्याचा निर्णयही ग्रामसभेने घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.