पालीनगरी दुमदुमली 
मुंबई

भाविकांच्या गर्दीने पालीनगरी दुमदुमली 

सकाळ वृत्तसेवा

पालीः नववर्षातील पहिल्या संकष्टी चतुर्थीनिमित्त येथील अष्टविनायकापैकी एक असलेल्या बल्लाळेश्‍वराच्या दर्शनासाठी सोमवारी (ता. 13) भाविकांची मोठी गर्दी होती. दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.


संकष्टीनिमित्त दर्शनासाठी रायगड जिल्हा, महाराष्ट्रातील विविध भागांसह मुंबई, ठाणे, पुणे आदी शहरांतील भाविक व पर्यटक मोठ्या प्रमाणावर पालीत दाखल झाले होते. अत्यंत भक्तिभावाने व शांततेत भाविक दर्शन घेताना दिसले. नेहमीप्रमाणे येथील दुकानदार व हॉटेल व्यावसायिकांचा धंदाही तेजीत होता. देवळात येणारे भाविक आवर्जून येथून खरेदी करत होते. अनेक कुटुंब बल्लाळेश्‍वराचे दर्शन घेण्यासाठी वर्षानुवर्षे न चुकता येतात. संकष्टीनिमित्ताने अनेकांनी अष्टविनायक देवस्थानच्या वारीसाठीही बेत आखल्याने आपसूकच पालीतील बल्लाळेश्‍वर मंदिरात गर्दी वाढल्याचे दिसून आले.

युवक, तरुण, महिला यांनी पायी दिंडीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याचे दिसून आले. भजन, कीर्तन, गणेशवंदना व नृत्याचा ठेका धरत भाविक भक्तिमय वातावरणात तल्लीन झाल्याचे दिसून आले. मंगळवारी (ता. 28) येणाऱ्या माघी महोत्सवाची जय्यत तयारी देवस्थानने सुरू केली आहे. भाविकांनाही माघी गणेश महोत्सवाची ओढ लागल्याचे दिसते. उत्सवानिमित्ताने मंदिर परिसराचे सुशोभीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे नेहमीच्या रांगामध्ये बदल करून हॉलमधून भाविकांना रांगेत दर्शन घेण्याची व्यवस्था केली होती.
 
पालीत दाखल झालेल्या भाविकांच्या गाड्यांमुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती; परंतु पाली पोलिस व बल्लाळेश्‍वर देवस्थानचे सुरक्षा रक्षक वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करत होते. पोलिस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New ST Buses Decision : सतेज पाटलांनी मागणी करताच राज्य सरकार नवीन आठ हजार एसटी बसेसची खरेदी करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Nagpur Street Food Price Hike : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना झटका! उद्यापासून तर्री पोहे आणि समोसा खाणे महागणार; पाहा काय आहेत नवीन दर?

Women Cricket: क्रिकेटमधील महिलांचा उत्साह दुपटीने वाढला; भारतातील १४ राज्यांचा सर्व्हे, युवा खेळाडूंची पावले सरसावली

Rural LPG Crisis News:गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली; महिलांची अडचण वाढली; धूरमुक्त स्वयंपाकघर पुन्हा धुरकट

कसं झालेलं दादा कोंडके यांचं निधन? महाराष्ट्राच्या 'सोंगाड्या'च्या मृत्यूचं कोडं कधीच सुटलं नाही

SCROLL FOR NEXT