संपांमुळे फरपट
संपांमुळे फरपट  
मुंबई

खालापूरकरांची संपांमुळे फरपट

सकाळ वृत्तसेवा

खालापूरः ऐन शेतीचा सुरू असलेला हंगाम, नागरिकांना लागणारे शासकीय दस्तऐवज यामुळे तालुक्‍यात महसूल कार्यालयांमध्ये कायम ये-जा सुरू असते; मात्र कर्मचाऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या संपांमुळे तालुकावासीय पुरते हैराण झाले आहेत. बुधवारी (ता. 15) महसूल कर्मचाऱ्यांनी केलेल्या लेखणी बंदमुळे नागरिकांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला. त्याशिवाय आता दुसरा, चौथा शनिवार आणि रविवारची सुटी यामुळे सर्वसामान्यांना मात्र सरकारी कार्यालयांचे उंबरठेच झिजवावे लागणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यावर पर्याय काढून सर्वसामान्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी तालुकावासीयांमधून केली जात आहे.

भूखंड माफियांविरोधात प्रसाद लाड उपोषणाला
 
तालुक्‍यात महसूल कर्मचाऱ्यांच्या नवीन वर्षातील दुसऱ्या संपामुळे कामासाठी आलेल्या नागरिकांचा खोळंबा होत आहे. वारंवार सुरू असलेल्या संपाला नागरिक वैतागले आहेत. नवीन वर्षात सार्वजनिक सुट्यांचा भडीमार आहेच. त्यात महिन्याच्या दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी; शिवाय रविवार सुटीमुळे महिन्यातील जेमतेम 20 दिवस शासकीय कार्यालय सुरू राहत असताना विविध मागण्यांसाठी लेखणी बंद, संपाचे हत्यार उपसण्यामुळे नागरिकांची फरपट होत आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी तालुक्‍यातील राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे 2018 पासून आंदोलन सुरू आहे. नवीन वर्षात 8 जानेवारीला देशव्यापी संपही करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा आठच दिवसांत बुधवारी महसूल विभागाच्या लेखणी बंदमुळे कामासाठी तहसील कार्यालय गाठलेल्या नागरिकांना माघारी जावे लागले. 


सर्वसामान्य जनतेला त्रास होऊ नये यासाठी यापुढे आमच्या मागण्या चर्चेने सोडविण्याचा संघटनेने निर्णय घेतला आहे. यापुढे लेखणी बंद अथवा संप न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
- विजय पुजारी, कार्याध्यक्ष, जिल्हा महसूल कर्मचारी संघटना 

कधी काळी कामगार क्षेत्रात होणारे संप कामगारांची रोजीरोटी घेऊन गेले. त्यानंतर संप, कामबंद असे प्रकार सध्या फक्त शासकीय कार्यालयांत दिसत असून, असे संप बेकायदेशीर ठरवून एक दिवसाचे वेतन कापणे गरजेचे आहे. 
- आकाश धोत्रे, नागरिक, सावरोली, खालापूर 


संपामुळे आमची गैरसोय होत आहे. कामाच्या ठिकाणी रजा टाकून आल्यानंतरही एका दिवसात काम होत नाही. अनेकदा फेऱ्या माराव्या लागतात. शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन, सोईसुविधा शेतकऱ्यांपेक्षा कितीतरी पटीने चांगल्या आहेत. असे असतानाही सारखे संप होत असतील तर सर्वसामान्य माणसांचा उद्रेक होईल. 
- सुरेश गावडे, शेतकरी, जांभिवली, चौक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT