भुखंड माफियांविरोधात आमदार प्रसाद लाड उपोषणाला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

मुंबई - शिव परीसरातील भुखंड माफिया विरोधात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिव पोलिसठाण्याबाहेर उपोषण सुरु केले आहे.या माफियामुळे नागरीकांना प्राथमिक सुविधाही पुरवात येत नसून पोलिसांनी संबंधीत व्यक्तीवर तत्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी त्यांनी उपोषण सुरु केले आहे.

मोठी बातमी - मटणाचा झाला भडका; पाहा नेमकं काय घडलं!

मोठी बातमी - शहीद अशोक कामटे, आपली मालमत्ता जाहीर करा..

आमदार प्रसाद लाड यांच्या विकास निधीतून शिव येथे एका भुखंडावर बहुद्देशीय केंद्र आणि सार्वजनिक स्वच्छतागृह बनवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हा भुखंड मंजूर करण्यात आला आहे. मात्र, या भुखंडांचा ताबा माफियाने घेतला आहे. त्यामुळे तेथे बांधकाम होऊ शकत. गेल्या तीन महिन्यापासून या भुमाफिया विरोधात लढा देत आहे. मात्र, त्याच्यावर पोलिस कारवाई होत आहे.

मोठी बातमी -  रायगडच्या 'या' तालुक्यातील लोकं घरं सोडून पळतायेत!

मोठी बातमी -  मोठी बातमी : फ़ायरब्रॅन्ड नेते संजय राऊत यांना अटक होणार का ?

या व्यक्तीवर 16 गुन्हे दाखल असले तरी पोलिसांनी अटक केल्यानंतर तो पुन्हा सुटून बाहेर येतो. बाहेर आल्यावर पुन्हा सामान्य नागरीकांना धमकावण्याचे प्रकार सुरु होता. या माफियाला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी उपोषणाला बसलो असल्याचे लाड यांनी सांगितले. पोलिस आणि त्या माफियाचे संगनमत असल्याने कारवाई होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. 

mla prasad lad starts agitation against land mafia

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mla prasad lad starts agitation against land mafia