भूमिअभिलेख कार्यालय sakal
मुंबई

Raigad : जमीन मोजणीची शेकडो प्रकरणे प्रलंबित

तालुक्यात जमीन खरेदी-विक्री व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहेत.

राजेश नागरे

कर्जत : शहरातील भूमिअभिलेख कार्यालयात मनुष्‍यबळाअभावी सुमारे चारशेपेक्षा अधिक जमीन मोजणीची कामे प्रलंबित आहे. आता पावसाळा सुरू झाल्‍याने मोजणीच्या कामास आणखी विलंब होण्याची शक्‍यता असल्‍याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

कर्जत तालुका ग्रीन झोन असल्याने येथे आजही शांत, प्रदूषण विरहित निसर्गरम्य वातावरण अबाधित आहे. त्यामुळे धकाधकीच्या जीवनातून वीकेण्ड शांततेत घालवण्यासाठी अनेकजण कर्जतमध्ये सेकंड होमचा पसंती देतात. याच संकल्पनेतून फार्महाऊस संस्कृती उदयास आली. महाराष्ट्रात सर्वाधिक फार्महाऊस कर्जत तालुक्यात आहेत. त्‍यातच आता कृषी पर्यटन, पंचतारांकित रेस्‍टॉरंटही सुरू झाले आहेत.

तालुक्यात जमीन खरेदी-विक्री व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहेत. यात मुख्य भूमिका असते भूमिअभिलेख कार्यालयाची. जमीन कोणाच्या नावावर आहे, तिचा सर्व्हे क्रमांक, हद्द, आजूबाजूच्या कोणाची हरकत, संबंधित जागेची मोजणी आवश्यक असते. त्यामुळे जमीनमालक सर्व्हेसाठी कर्जत उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज करतात. मात्र रिक्त पदे आणि येथील अनागोंदी कारभारामुळे मोजणीची प्रकरणे प्रलंबित राहत आहेत.

जमीन खरेदी करताना अथवा बिनशेती करण्यासाठी, मालकी हक्‍कावरून होणारे दोघांचा वाद मिटवण्यासाठी जमीन मोजणी बंधनकारक आहे. तसेच जमिनीवरील बांधकाम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बांधकामाची प्लिन्थ मोजणीही बंधनकारक असल्याने भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज मोठ्या प्रमाणात मोजणीसाठी दाखल होत आहेत. महिनाभरात एक कर्मचारी जेमतेम पंधरा जमिनीची मोजणी करू शकतो. सध्या दोन कर्मचारी मोजणी करण्याकरिता कार्यालयात आहेत तर दोन पदे रिक्‍त आहेत.

पावसामुळे कामात अडथळा

पावसाळा सुरू झाल्याने जमीन मोजणीत अडथळा येत असल्याने कर्मचाऱ्यांना अनेकदा मोजणी न करताच परतावे लागते. त्‍यामुळे अर्जदाराला नवीन तारीख द्यावी लागते. एकीकडे मनुष्‍यबळाचा अभाव तर दुसरीकडे पावसामुळे जमीन मोजणीस विलंब होत आहे. वारंवार खेटा माराव्या लागत असल्‍याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

जमीन मोजणीची अनेक जुनी प्रकरणे प्रलंबित आहेत. मनुष्‍यबळाअभावी मोजणीस विलंब होत असून वरिष्ठांना या बाबत पत्राद्वारे कळविले आहे तसेच कर्मचारी वाढवून देण्याची मागणी केली आहे. नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात येत असून अधिकाधिक प्रकरणे निकाली काढण्यात येतील.

- नितीन आवटे,उपअधीक्षक भूमी अभिलेख, कर्जत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आमदारकीच्या 9 जागांसाठी धूमशान, निवडणूक आयोगाकडून मतदान अन् मतमोजणीची तारीख जाहीर

Hasan Mushrif vs Shivaji Patil : मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटलांमध्ये बिनसलं, मुश्रीफांवर गंभीर आरोप करत अप्रत्यक्ष सतेज पाटलांवर टीका

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट

Temple Travel: रेन अलर्ट देणारे ‘मान्सून’ मंदिर! पाऊस येण्याआधीच छतातून टपकतात थेंब, विज्ञानाला न सुटलेले कोडे..

Saving Money Tips : बंगळूरसारख्या महागड्या शहरात 22 वर्षांच्या तरुणीचा 18 हजारांत संसार! कसं करते मॅनेज? जाणून घ्या तिचं 'सिक्रेट'

SCROLL FOR NEXT