महाड sakal
मुंबई

Raigad : कीर्तन ऐकण्यासाठी येतात साक्षात शिवराय

भाविक सुश्राव्य कीर्तनात दंग होत असून कीर्तनाचा आस्‍वाद घेण्यासाठी दररोज साक्षात छत्रपती शिवाजी महाराज येतात.

सकाळ वृत्तसेवा

महाड : महाडच्या श्री वीरेश्वर महाराजांच्या सभागृहात छबिना उत्सवानिमित्त पाच दिवस कीर्तनाचे आयोजन करण्यात येत आहे. भाविक सुश्राव्य कीर्तनात दंग होत असून कीर्तनाचा आस्‍वाद घेण्यासाठी दररोज साक्षात छत्रपती शिवाजी महाराज येतात.

श्री वीरेश्‍वराच्या सभागृहात शिवरायांचा पुतळा स्थानापन्न करून महाराजांच्या उपस्थितीत कीर्तन करण्याची परंपरा गेल्‍या शेकडो वर्षांपासून जपली जात आहे.

महाडच्या वीरेश्वर मंदिराला ऐतिहासिक महत्त्व आहे. हे मंदिर शिवकालीन मानले जाते. येथील छबिनोत्‍सवालाही शतकोत्तरी परंपरा असून वीरेश्वराच्या दर्शनासाठी छत्रपती शिवाजी महाराज देखील येत असल्याचे सांगितले जाते.

पूर्वजांकडून पुढील पिढीला याबाबत माहिती देण्यात आल्‍यावर छत्रपती शिवरायांची आठवण कायमस्वरूपी राहावी, यासाठी वीरेश्वर छबिनोत्‍सवात छत्रपतींची उपस्थिती त्यांच्या पुतळ्याच्या स्वरूपात असते. १६ फेब्रुवारीपासून सुरू झालेला हा उत्‍सव बुधवार, २२ फेब्रुवारीपर्यंत सुरू आहे तर फाल्गुन शुद्ध द्वितीयेला, मंगळवारी याठिकाणी मोठी जत्रा भरली, त्यालाच मुख्य छबिना संबोधले जाते.

उत्सवामध्ये पाच दिवस कीर्तनाचे आयोजन केले जाते. या वर्षी धनंजय गद्रे यांचे कीर्तने आयोजित केली आहे. कीर्तनामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा स्थानापन्न केला जातो. भाविक व श्रोत्यांसह साक्षात छत्रपती कीर्तनाचा आस्वाद घेत असल्‍याचा भास यावेळी होतो.

पूर्वी देखील छत्रपती शिवराय अशाच प्रकारे कीर्तन श्रवण करत असावे, या धारणेतून दरवर्षीही परंपरा राखली जाते. छत्रपतींच्या पुतळा चौरंगावर स्थानापन्न केला जातो.

या वर्षीपासून शिवप्रेमी सुरेश पवार यांच्याकडील छत्रपतींचा पुतळा मंदिरामध्ये देण्यात आला आहे. वीरेश्वर मंदिरांमधील या अनोखी परंपरेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण छबिना उत्सवात दरवर्षी होत असते. छबिनोत्‍सवात जिल्‍ह्यासह राज्‍यभरातील भाविक आवर्जून भेट देतात. नोकरदार मंडळी मोठ्या संख्येने कुटुंबासह शहरात दाखल होतात.

महाडच्या छबिना उत्‍सव आणि श्री वीरेश्‍वराच्या दर्शनासाठी छत्रपती शिवाजी महाराज आवर्जून उपस्‍थित राहायचे, याबाबत पूर्वजांकडून

ऐकत आलो आहोत. उत्‍सवाला शतकोत्तरी परंपरा आहे. त्‍यामुळे ही परंपरा पुढे सुरू ठेवण्याचा प्रयत्‍न देवस्‍थानकडून केला जात आहे.

- दीपक वारंगे, सरपंच, वीरेश्वर देवस्थान समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress review meeting chaos : बिहार निवडणुकीत दारुण पराभवामुळे दिल्लीत काँग्रेसच्या आढावा बैठकीत गोंधळ; नेत्यांमध्ये जोरदार वाद!

Santosh Deshmukh Case: फरार कृष्णा आंधळेच्या शोधाबाबत अहवाल सादर करा; न्यायालयाच्या सूचना; १२ डिसेंबरला आरोप निश्‍चिती शक्य

Pune Police : आंदेकर टोळीने उमरटीतून १५ पिस्तुले विकत घेतली;टोळीवर आणखी एक गुन्हा दाखल होणार!

Ghodegaon Theft : घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या चोरीप्रकरणी दोन आरोपी अटकेत!

Pune New Police Stations : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ; शहरात पाच नवीन पोलिस स्टेशन्स वाढणार, जाणून घ्या कुठे?

SCROLL FOR NEXT