poladpur sakla
मुंबई

Raigad : पोलादपूर शहरात खड्ड्यांमुळे प्रवासी त्रस्त

कोकणातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महमार्गाकडे लक्ष न दिल्याने चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या कामादरम्यान सध्या महामार्गाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. दहा वर्षांपासून रखडलेले मुंबई-गोवा महामार्गाचे काम कोकणवासीयांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे उन्हाच्या दिवसात धुळीतून, तर पावसाळ्यात चिखल आणि मार्गावर साचलेल्या पाण्याचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू असून, अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी हे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी तर नवीन मार्गिकेवर जाण्यासाठी रस्ते करण्यात आले आहेत. काही मार्गांवर खड्डे पडल्याने त्यावर माती दगड टाकण्यात आले होते; मात्र गेल्या तीन ते चार दिवसांत पडणाऱ्या पावसामुळे माती उखडून गेल्याने रस्त्यावर चिखल झाला आहे. त्यात पाणी साचल्याने वाहनचालकांचा अंदाज चुकत आहे.

भूमिगत मार्गिकेच्या कामामुळे एकेरी मार्गावरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू केल्याने वाहतूक कोंडी होत आहे. याच सर्व्हिस रोडवर पोलादपूर पंचायत समितीसमोर खड्डे पडल्याने वाहने आदळत असतात. त्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

त्रासदायक प्रवास

राज्यातील बहुतांश रस्त्याची कामे सुरू आहेत; मात्र कोकणातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महमार्गाकडे हवेतसे लक्ष न दिल्याने चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. येथून प्रवास सुखाचा होण्यापेक्षा त्रासदायक होऊ लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT