आरोग्य केंद्र
आरोग्य केंद्र 
मुंबई

आरोग्य केंद्राचेच आरोग्य बिघडते, तेव्हा...

सकाळ वृत्तसेवा

अलिबागः जिल्हा परिषदेच्या चोंढी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था झाली आहे. गळके छप्पर, तडे गेलेल्या भिंती, जुन्या इलेक्‍ट्रिक लाईन, अनियमित पाणीपुरवठा, शौचालयाची मोडतोड अशा अवस्थेत येथे येणाऱ्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या दवाखान्याची इमारत नव्याने बांधून मिळावी, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.

या रुग्णालयात उपचार मिळत नसल्याने अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी जावे लागते. जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीप भोईर यांनी 8 ऑगस्टला मागणी केली होती. 1951 मध्ये बांधण्यात आलेल्या या इमारतीमधील तीन रूम जिल्हा परिषदेला रुग्णालयाच्या वापरासाठी देण्यात आलेले आहेत; मात्र ही इमारत जुन्या पद्धतीची असल्याने ठिकठिकाणी तडे गेलेले आहेत. शौचालयाची दुरवस्था झाल्याने ते वापरता येत नाही. कौलारू छतातून पावसाळ्यात पाणी गळत असते, अशा परिस्थितीत रुग्णांवर उपचार करणे अवघड जात आहे.

चोंढी, मापगाव, किहीम परिसरातील साधारण पाच ते चार हजार लोकवस्तीला हे जवळचे सरकारी रुग्णालय आहे. या ठिकाणी गरोदर महिलांच्या प्रसूतीची व्यवस्था आहे; परंतु इतर सुविधा नाहीत. त्यामुळे हे रुग्णालय असून सामान्य नागरिकांना कोणत्याही उपयोगाचे नाही. ही इमारत शेटे कुटुंबीयांनी 10 नोव्हेंबर 1951 रोजी तत्कालीन कुलाबा बोर्डाला दिली होती. दत्ताराम शेटे यांनी आपली पत्नी आनंदीबाई यांच्या स्मरणार्थ ही इमारत दान करत औषधे, उपकरणे, फर्निचर, स्टेशनरी वगैरे प्रारंभिक साधने कायमची देणगी म्हणून दिली आहे. जिल्हा परिषदेकडे ही इमारत हस्तांतरित झाल्यानंतर इमारतीची डागडुजी झाली नाही. यामुळे येथील रुग्णांना खासगी रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात दाखल व्हावे लागते. 

डागडुजी शक्‍य नाही. त्यामुळे नवी इमारत बांधण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या येथे प्रकर्षाने जाणवते. काही वर्षांपूर्वी दुरुस्ती केलेली होती; परंतु ती पुरेशी नव्हती. येथील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा देण्यासाठी या इमारतीचे बांधकाम पाडून नव्याने करणे आवश्‍यक आहे. 
- दिलीप भोईर, सभापती, समाजकल्याण (राजिप) 

ही इमारत आणि इमारतीखालील जागा धर्मार्थ प्रयोजनासाठी दिलेली आहे. त्यामुळे सर्व तांत्रिक बाबी पडताळून नव्या इमारतीच्या बांधकामासंदर्भात प्रस्ताव तयार करावा लागेल. 
- डॉ. सुधाकर मोरे, 
जिल्हा आरोग्य अधिकारी (राजिप) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT