धुरळा 
मुंबई

रायगडच्या "पालकत्वा'वरून धुरळा! 

सकाळ वृत्तसेवा

पालीः रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अदिती तटकरे यांना पालकमंत्रिपद मिळाल्यानंतर शिवसेनेच्या राजकीय गोटात मोठी खदखद सुरू झाली आहे. जिल्हा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून समाजमाध्यमांवर नाराजी दर्शविणाऱ्या पोस्टचा धुरळा उडाला आहे. पालकमंत्रिपद राष्ट्रवादीकडे गेल्याने सुधागडातील शिवसैनिकांतही नाराजीचा सूर उमटत आहे.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार स्थापन होत असताना जिल्ह्यात ज्या पक्षाचे जास्त आमदार निवडून येतील त्याच पक्षाचा पालकमंत्री होणार असल्याचे भाष्य केले होते. त्यामुळे तीन आमदार निवडून आलेल्या रायगड जिल्ह्यात पालकमंत्रिपदाचा हक्क शिवसेनेकडे होता; मात्र अजित पवार यांचा शब्द रायगड जिल्ह्यात मोडला असल्याची प्रतिक्रिया शिवसेना माजी जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी पालीत पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
 
महाड-पोलादपूर मतदारसंघावर भरत गोगावले यांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीत सलग तीनदा भगवा फडकला आहे. भरत गोगावले यांची लोकप्रियता व जनसंपर्क दांडगा आहे. अशातच गोगावले यांच्याच गळ्यात पालकमंत्रिपदाची माळ पडणे अपेक्षित होते; मात्र शिवसेनेच्या पदरी घोर निराशा आली. जिल्ह्याच्या सत्तेच्या वाटपात मापात पाप झाल्याची भावना जुने-जाणते, निष्ठावान व ज्येष्ठ शिवसैनिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीत सारे काही आलबेल दिसत असले तरी जिल्ह्यात मात्र विविध तालुक्‍यांत आलबेल नसल्याची परिस्थिती स्पष्टपणे दिसत आहे.

बेस्ट कामगारांचे आरोग्य धोक्यात
 
जिल्ह्यातील सात मतदारसंघांपैकी तीन शिवसेना, तीन भाजप तर एक राष्ट्रवादी असे आमदारांचे संख्याबळ आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जिल्ह्यात शिवसेनेला एकाचवेळी मंत्रिपद व पालकमंत्रिपदापासून दूर ठेवल्याने जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. जिल्ह्यात पालकमंत्री हटाव ही मोहीम शिवसैनिक विविध सभांद्वारे राबविताना दिसत आहेत. अशातच प्रकाश देसाई यांनी रायगड जिल्ह्यात शिवसेनेला पालकमंत्रिपद मिळावे याकरिता आम्ही शेवटपर्यंत आग्रही राहणार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
 
सुधागड तालुक्‍यातील जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देशमुख, सुधागड तालुका शिवसेनाप्रमुख मिलिंद देशमुख, पंचायत समिती सभापती नंदू सुतार, उपसभापती उज्ज्वला देसाई व अन्य शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांनीही रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री शिवसेनेचाच व्हावा, अशी जोरदार मागणी लावून धरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT