गरिबांचा फ्रीज 
मुंबई

"गरिबांचा फ्रीज' महागला

सकाळ वृत्तसेवा

माणगावः उन्हाळा सुरू झाला आणि काहिली वाढू लागली आहे. वाढणाऱ्या झळा जीव कासावीस करत असताना गारेगार पाण्याने तहान भागविण्यासाठी माणगावच्या बाजारपेठेत राजस्थानी माठांचे आगमन झाले आहे. लहान-मोठ्या आकारात उपलब्ध असणारे हे माठ 100 ते 150 रुपयांपर्यंत विकली जात आहेत. नळ लावलेले माठही उपलब्ध असून, 200 रुपयांपर्यंत विक्रीस उपलब्ध आहेत. सर्वसामान्यांच्या पसंतीस उतरणारे हे माठ फ्रीजमधील अतिथंड पाण्यापेक्षा नैसर्गिक व आरोग्यदायी आशा पाण्यासाठी माणगावकरांच्या पसंतीस उतरत आहेत.

भिवंडी पालिका ठेकेदारावर मेहरबान
 
आंध्र प्रदेशवरून आणले जाणारे हे माठ एका वेळेस इतक्‍या प्रमाणात एका गाडीत आणले जातात. स्थानिक मडक्‍यांनाही बाजारात चांगली मागणी असली तरी आधुनिक जीवनशैलीमुळे कुंभारकाम करणारे कारागीर दुर्मिळ झाल्याने परराज्यातील माठ खरेदी करण्याशिवाय नागरिकांना दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नाही. 
गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी 20 टक्के भाववाढ झाली आहे. गेल्या वर्षी लहान माठ 80 रुपयांपर्यंत मिळत होता, तर मोठे माठ 100 रुपयांपर्यंत उपलब्ध होते. या वर्षी मात्र बाजारातील भाववडीचा परिणाम, वाहतुकीचे वाढलेले दर यामुळे माठ महाग झाल्याचे विक्रेते सांगतात. नळ बसविलेल्या माठांना विशेष मागणी असून, साधारण 50 ते 60 रुपये जादाचे आकारून व्यावसायिक माठाला नळ बसवून देत आहेत. उन्हाळा वाढेल तसे माठाची विक्री वाढणार आहे. विशेष म्हणजे माठ विक्रीसाठी परप्रांतीय व्यापारी मोठ्या प्रमाणात दिसत असून, स्थानिक कुंभार व्यवसाय बंद होत असल्याने परप्रांतीय विक्रेते व माठ दिसत आहेत. 

उन्हाळा वाढल्याने माठ विक्री वाढली आहे. आंध्र प्रदेशवरून हे माठ आले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी किमती वाढल्या आहेत. नळ असणाऱ्या माठाला चांगली मागणी आहे. 
- विजयकुमार, माठ विक्रेता, माणगाव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI Action : एव्हरेस्ट जिरे पावडरची ‘ही’ बॅच वापरू नका; कीटकनाशकांचे अवशेष मर्यादेपेक्षा जास्त आढळले, FSSAI ने दिले रिकॉलचे आदेश

IND vs WI T20I: वेस्ट इंडिजच्या ट्वेंटी-२० संघात बदल; भारताला झोडणाऱ्या खेळाडूची एन्ट्री, तिसरी वन डे जिंकल्यावर आलाय कॉन्फिडन्स...

सार्वजनिक स्वच्छतागृहात अल्पवयीन तरुणांची नशापार्टी, ड्रग्सचा डबल डोस घेताच १७ वर्षीय मुलाचा मृत्यू; चक्रावणारा व्हिडिओ Viral

‘लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणं बरोबर!’ किरण राव यांचं मांडलं स्पष्ट मत; म्हणाल्या...

PM Kisan Scheme for Women Farmers : महिला शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' अटी पूर्ण केल्यास खात्यात जमा होणार वार्षिक 6 हजार रुपये, जाणून घ्या पात्रता आणि नियम

SCROLL FOR NEXT