दरड कोसळली
दरड कोसळली sakal
मुंबई

Raigad : पोलादपूरमध्ये दोन ठिकाणी दरड कोसळली

राजेश नागरे

पोलादपूर : रायगड जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून पोलादपूर तालुक्यात ओंबळी रस्त्यावर दरड कोसळण्याची घटना मंगळवारी घडली. मातीचा ढिगारा व मोठमोठे दगड रस्‍त्‍यावर आल्‍याने वाहतूक बंद झाली होती. याबाबत माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने दखल घेत जेसीबीच्या साह्याने दरड बाजूला करून रस्‍ता वाहतुकीस खुला केला.

उमरठ खोपड-ढवळे रस्त्यावर मोरझोत धबधब्याजवळही दरड कोसळली. प्रशासनाने माती व दगड बाजूला करत काही तासांत रस्‍ता मोकळा केल्‍याने वाहतूक पूर्ववत सुरू झाली. तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून सखल भागात तसेच महामार्गालगतच्या सर्व्हिस रस्‍त्‍यावर पाणी साचले आहे.

काही ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्‍या आहेत. आनंदनगर येथे सोमवारी झाड पडल्‍याने वैशाली सलागरे याच्या घराच्या छप्परचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे व नगरपंचायतचे महादेव सरंबळे यांनी पाहणी करत झाड तोडण्याचे व तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले. पावसामुळे दरडीचा धोका लक्षात घेऊन महाड तालुक्‍यातील ७२ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गोठ्यातील तीन शेळ्या दगावल्‍या

रोहा (बातमीदार) : तालुक्यात चार दिवसांपासून मौसमी पावसाने दमदार हजेरी लावली असून शनिवारी (ता.२४) पुई येथील शेतकरी ज्ञानेश्वर गंगाराम दळवी यांचा गोठा कोसळला. यात तीन शेळ्या दगावल्या असून काही जखमी झाल्या आहेत. शेतीला पूरक व्यवसाय म्‍हणून दळवी यांनी काही वर्षांपूर्वी शेळीपालन व्यवसायास सुरू केला. या व्यवसायातील बारकावे अभ्यासून व्यवसायात जम बसवला असतानाच पावसाळ्याच्या सुरुवातीलाच गोठा कोसळून त्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: मविआचा फॉर्म्युला ठरला?, कुणाला मिळणार किती जागा, जागावाटपाबाबत निकष काय?

Rohit Pawar: "अधिवेशन होऊ दे...फंड मिळू दे…आम्ही विचार करु", कोणाला पक्षात घ्यायचं याबद्दल रोहित पवार स्पष्टच बोलले

Latest Marathi Live Updates : दार्जिलिंग रेल्वे अपघातात 8 जणांचा मृत्यू, 50 जण जखमी; बचावकार्य पूर्ण

Goa Monsoon Trip: सोनेरी वाळू अन् रूपेरी लाटा.... 'या' 5 कारणांमुळे पावसाळ्यात गोवा ट्रिप बनवू शकता खास

IND vs AFG : सुपर-8च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या कॉम्बिनेशनमध्ये मोठा बदल... 'या' स्टार खेळाडूची होणार एंट्री?

SCROLL FOR NEXT