file photo
file photo  
मुंबई

रायगडची अस्सल कृषी उत्पादने क्‍लिकवर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पांढरा कांदा, कडधान्य, कर्जत कोळम अशी नानाविविध पिके रायगड जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण करतात; परंतु खरेदी-विक्रीचे गणित जुळत नसल्याने या उत्पादनातून जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या पदरात फारसे पडत नाही. त्यांची हीच व्यथा समजून घेत जिल्हा परिषदेने डिजिटल क्षेत्रात पाऊल टाकले असून शेतकऱ्यांना ग्राहकांबरोबर जोडण्यासाठी "रायगड कृषी बाजार' हे ऍप आणि वेबसाईट विकसित करण्यात येत आहे. याचा फायदा जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. 

रायगड जिल्ह्यातील शेतकरी भातशेतीबरोबर फळलागवड, भाजीपाला लागवड करतो. त्यांनी घेतलेली पांढरा कांद्यासह मटकी, पांढरे वाल, सुपारीही लोकप्रिय आहे. माणगावची भाजी, कलिंगडे तर राज्याच्या कानाकोपऱ्यात जातात. काही ठिकाणी गावठी कडधान्ये प्रसिद्ध आहेत. मात्र या उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळत नाही. 

रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील, कृषी सभापती प्रमोद पाटील यांच्या कल्पनेतून जिल्हा परिषद यांनी या संदर्भात विचार करून "रायगड कृषी बाजार' हे ऍप साकारण्याचा निश्‍चय केला होता. त्यानुसार काम सुरू झाले आहे. जिल्हा परिषद "ना नफा ना तोटा' या तत्त्वावर काम करणार आहे. पनवेल येथील तरुण विशाल म्हात्रे यांनी हे ऍप आणि वेबसाईट विकसित करण्याचे काम केलेले आहे. कृषिदिनी 1 जुलैला याचे उद्‌घाटनही झाले. पहिल्या टप्प्यात या माध्यामाद्वारे दोन लाख शेतकरी जोडले जाणार आहेत. 

असा होणार फायदा 
रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतल्या उत्पादनाची योग्य माहिती ग्राहकांना मिळत नाही. त्यातून ग्राहकांची फसवणूक होते. त्यामुळे अस्सल उत्पादने कुठे मिळतात, त्याची माहिती ऍपवर मिळणार आहे. आवश्‍यकता वाटल्यास ग्राहक व पर्यटक शेतकऱ्यांच्या शेतावरही भेट देऊन माल खरेदी करू शकेल. पहिल्या टप्प्यामध्ये सध्या नोंदणीचे काम सुरू आहे. त्याचबरोबर माहिती गोळा करण्यासाठी तालुका पंचायत समितीचा कृषी विभाग मदत करत आहे. या उत्पादनाची माहिती अपलोड झाल्यानंतर ग्राहक ऑनलाईन पद्धतीने या शेतकऱ्याशी संपर्क साधून त्याचे उत्पादन खरेदी करू शकणार आहेत. घाऊक व्यापारालाही यातून चालना मिळेल. दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद यासाठी आवश्‍यक असणारी यंत्रणा उभारणार आहे. यातून अनेक तरुण मुलांना रोजगार मिळणार आहे. शेतकऱ्यांना याबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. पुढील काळात हे ऍप कसे वापरावे याबाबत यू-ट्युबद्वारे माहितीही देण्यात येणार आहे, असे विशाल म्हात्रे यांनी सांगितले. 

रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आव्हाने पेलण्यासाठी जिल्हा परिषद मदत करत आहे, ही समाधानाची बाब आहे. हे ऍप पुढील पिढीलाही मदत करणारे ठरणार आहे. 
- राजेंद्र कदम, शेतकरी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT