मुंबई

रेल्वे अपघातात तुटलेला हात पुन्हा जोडला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - लोकलखाली कापला गेलेला हात पुन्हा जोडण्याची कामगिरी कूपर रुग्णालयातील डॉक्‍टरांनी केली आहे. कूपर रुग्णालयामध्ये तब्बल सात तासांच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचा तुटलेला उजवा हात पुन्हा एकदा दंडाशी जोडण्यात आला. 

गुजरातहून मुंबईत आलेला धर्मेंद्र (वय २८) अंधेरी स्थानकात उभ्या असलेल्या लोकलमधून खाली पडला. या अपघातात त्याचा उजवा हात लोकलच्या चाकाखाली आल्याने दंडापासून पूर्णपणे वेगळा झाला. रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी तातडीने धर्मेंद्रला तातडीने नजीकच्या कूपर रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक तपासणीनंतर मध्यरात्री १ वाजता रुग्णालयातील डॉक्‍टरांनी धर्मेंद्रवर शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली, ती सकाळी ८ वाजता संपली. सलग सात तासांच्या शस्त्रक्रियेनंतर धर्मेंद्रचा तुटलेला उजवा हात पुन्हा एकदा उजव्या दंडाशी जोडला गेला. 

शस्त्रक्रियेला महिना उलटल्यानंतर आता धर्मेंद्रच्या हाताच्या संवेदनांमध्ये सुधारणा दिसून येत आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे यांनी दिली. कूपर रुग्णालयातील प्लास्टिक सर्जरी विभागाचे डॉ. नितीन घाग यांच्या नेतृत्वाखाली विभागातील डॉक्‍टरांनी ही शस्त्रक्रिया केली. वर्षभरात धर्मेंद्रचा हात पूर्ववत होईल, अशी माहिती डॉक्‍टरांनी दिली. 

धर्मेंद्रला वेळेवर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळेच त्याचा तुटलेला हात पुन्हा जोडणे शक्‍य झाले. हात-पाय यासारखा अवयव तुटला असल्यास त्या भागातील रक्तप्रवाह थांबतो आणि अवयव निकामी होण्याची प्रक्रिया त्वरित सुरू होते. हात दंडापासून कापला गेला असेल, तर चार तासांच्या आत रुग्णावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. 
- डॉ. नितीन घाग, प्लास्टिक सर्जरी विभाग, कूपर रुग्णालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT