Cargo Railway sakal
मुंबई

Railway Accident : निष्काळजीपणामुळे मालगाडीचा झाला अपघात! चौकशी अहवालातून माहिती आली समोर

रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे पनवेल-कळंबोली दरम्यान मालगाडीच्या अपघात घडल्याची माहिती प्राथमिक चौकशी अहवालातून समोर आल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे पनवेल-कळंबोली दरम्यान मालगाडीच्या अपघात घडल्याची माहिती प्राथमिक चौकशी अहवालातून समोर आल्याची माहिती मिळत आहे. त्यादिवशी अपघात घडला त्या ठिकाणी रेल्वेने त्याच दिवशी रेल्वे रूळाखालील सिमेंटचे सहा स्लीपर बदलण्यात आले होते.

मात्र, हे स्लीप व्यवस्थित लागले की नाही याची खात्री केली नसल्याने स्लीपर तुटण अपघात घडला असल्याची माहीती रेल्वेच्या प्राथमिक चौकशी अहवाल समोर आली. त्यामुळे दोषी रेल्वे अधिकार्‍याला रेल्वेकडून चार्जशीट दिल्याची माहिती समोर आली आहे.

शनिवारी दुपारी पनवेल-कळंबोली दरम्यान मालगाडी घसरल्यामुळे लांब पल्याच्या मेल-एक्सप्रेसचे वेळापत्रक पूर्णतः कोलमडले होते. याचा परिणाम रविवारी दिवसभर होता त्यामुळे कोकणात जाणाऱ्या एक्स्प्रेस अनेक तासांच्या विलंबाने धावत होत्या. तर २६ मेल एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याची नामुष्की रेल्वे ओढवली होती.

मालगाडीची ही घसरगुंडी रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. मालगाडीच्या अपघातानंतर रेल्वेकडून प्राथमिक चौकशी करण्यात आली होती. आता ह्या प्राथमिक चौकशीचा अहवाल समोर आला आहे.

जिथे मालगाडीचा अपघात घडला त्या ठिकाणी नाला आहे. त्याला लागून असलेले रूळा खालचे स्लीपर खराब झाल्याने मध्य रेल्वेने तिथले सहा स्लीपर बदलले होते. मात्र, बदलण्यात आलेल्या स्लीपरनंतर रेल्वे रूळावरून कोणतीही गाडी जाण्याआधी त्याची तपासणी करून बंधनकारक होते.

मात्र सदरचे काम करणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांचे त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यानंतर लोडेट मालगाडी गेल्यानंतर स्लीपर तुटून मालगाडी घसरल्याचे रेल्वेच्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे. त्यामुळे सदर घटनेला जबाबदार असलेल्या संबंधित अधिकार्‍याला चार्जशीट दिल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meta Layoffs: मेटामध्ये छाटणी! कर्मचारी चवताळले; रागात ऑफिस आणि स्नॅक्स काउंटरमधील सामान लुटले, विचित्र किस्सा चर्चेत

Mumbai News: दोन समुद्री टनेलमधून मुंबईत पाणी पोहोचणार! समुद्रातून शुद्ध पाणी येणार; मनोरी प्रोजेक्ट तहान भागवणार

CSK vs SRH Live: संजू सॅमसने इतिहास रचला! MS Dhoni चा ऑल टाईम रेकॉर्ड मोडला; पॅट कमिन्सनेही हार्दिक पांड्याचा मोठा विक्रम मोडला

Bullet Train Look: 'वेगाची राणी' आली! भगवा रंग अन् फ्युचरिस्टिक डिझाइन... भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची पहिली झलक समोर

CBI Arrests RCC Classes Director Shivraj Motegaonkar : नीट पेपरफुटी प्रकरणात प्रा. शिवराज मोटेगावकर अटकेत; विशेष सीबीआय न्यायालयाकडून नऊ दिवस कोठडी

SCROLL FOR NEXT