Railway mega block
Railway mega block sakal media
मुंबई

कळवा-दिवा : ​धिम्या मार्गावर 24 तासांचा ब्लॉक; वाचा सविस्तर

कुलदीप घायवट

मुंबई : मध्य रेल्वेच्या (central railway) ठाणे ते दिवा (thane to diva) पाचव्या आणि सहाव्या मार्गावरील वळणासाठी नव्याने टाकलेल्या रुळावरून सध्याच्या धीम्या मार्गावरील रूळांना जोडण्यासाठी (Railway repairing work) कळवा आणि दिवा दरम्यानच्या अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर विशेष पायाभूत सुविधा ब्लॉक घेणार आहे. हा ब्लॉक (railway block) रविवारी, (ता. 2) च्या रात्री 2 वाजल्यापासून ते सोमवारी, (ता.3) च्या पहाटे 2 वाजेपर्यंत असा एकूण 24 तासांचा अप आणि डाऊन (Up and down slow track) धीम्या मार्गांवर घेतला जाईल. त्यामुळे उपनगरीय रेल्वे सेवेत (suburban railway) आणि मेल, एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. (Railway block at kalwa-diva slow track on Sunday for twenty four hours due to railway repairing work)

शनिवारी, (ता. 1) रोजी रात्री 11.52 वाजेपासून ते रविवारी, (ता.2) रोजी रात्री 11.52 वाजेपर्यंत कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप धीम्या/अर्ध जलद सेवा कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकावर थांबणार नाहीत. पुढे मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवले जातील आणि गंतव्य स्थानकावर निर्धारित वेळेच्या 10 मिनिटे उशिराने पोहोचतील.

रविवारी, (ता. 2) रोजी रात्री 12.05 वाजल्यापासून ते सोमवारी, (ता.3) रोजी रात्री 1.15 वाजेपर्यंत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या / अर्ध जलद सेवा मुलुंडहून येथून मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकावर थांबणार नाहीत आणि गंतव्यस्थानकावर 10 मिनिटे उशिराने  पोहोचतील.

1) ब्लॉक काळात कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत.

२) कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अनुक्रमे ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्याण येथून लोकलमध्ये गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी दिली आहे.

३) प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने महापालिका परिवहनशी समन्वय साधून बस चालवण्याची व्यवस्था केली आहे.

४) संपूर्ण ब्लॉक कालावधीत डोंबिवली येथून सुटणाऱ्या /टर्मिनेट होणारे लोकल सेवा उपलब्ध नसतील.

५) ब्लॉक कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल ठाणे, डोंबिवली आणि दिवा स्थानकाच्या जलद मार्गावरील फलाटांवर थांबतील.

६) ब्लॉकनंतर अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील सेवा नव्याने टाकलेल्या अप आणि डाऊन धिम्या मार्गावरून रेल्वे फ्लाय ओव्हरद्वारे धावतील आणि मुंब्रा स्टेशनच्या नवीन फलाटांवर थांबतील.

७) लोकल सेवा सोमवारी, (ता.3) रोजी नेहमीच्या वेळापत्रकानुसार धावतील.

८) शनिवारी, (ता.1) रोजी रद्द झालेल्या मेल/एक्सप्रेस सेवा

९) 12112 अमरावती-मुंबई एक्सप्रेस

१०) 12140 नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस

११) 17611 नांदेड – मुंबई राज्यराणी एक्सप्रेस

रविवारी, (ता.2) रोजी रद्द झालेल्या मेल/एक्सप्रेस सेवा

11007 / 11008 मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस

12071 / 12072 मुंबई-जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस

12109 /12110 मुंबई-मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस

11401 मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस

12123 /12124 मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन

12111 मुंबई-अमरावती एक्सप्रेस

12139 मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस

11139 मुंबई-गदग एक्सप्रेस

17612 मुंबई-नांदेड राज्यराणी एक्सप्रेस

सोमवारी, (ता.3) रोजी रद्द झालेल्या मेल/एक्सप्रेस सेवा

11402 आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस

11140 गदग-मुंबई एक्सप्रेस

एक्सप्रेस गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन / शॉर्ट ओरिजिनेशन

शनिवारी, (ता.1) रोजी सुटणारी गाडी क्रमांक 17317 हुबली-दादर एक्स्प्रेस पुणे येथे टर्मिनेट केली जाईल. रविवारी, (ता.2) रोजी सुटणारी 17318 दादर-हुबली एक्सप्रेस दादर ऐवजी पुण्याहून निघेल. शनिवारी, (ता.1) रोजी सुटणारी गाडी क्रमांक 11030 कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस पुणे येथे टर्मिनेट केली जाईल रविवारी, (ता. 2) रोजी सुटणारी 11029 मुंबई - कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस मुंबई ऐवजी पुण्याहून सुटेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलला राजीनाम्याचे आदेश, पालकांनी उचलले महत्त्वाचे पाऊल

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT