Railway esakal
मुंबई

Railway: खान्देशवासीयांसाठी खुशखबर; मुंबई सेंट्रल-भुसावळ स्पेशलला मिळाला विरारमध्ये थांबा

सकाळ डिजिटल टीम

वसई-विरार शहरात राहणाऱ्या खानदेशवासीयांच्या प्रमुख मागणीला रेल्वे मंत्रालय तसेच पश्‍चिम रेल्वेच्या सहयोगाने यश मिळाले आहे. मुंबई सेंट्रल ते भुसावळ स्पेशल गाडीला विरार येथे थांबा देण्यात आला आहे. या गाडीचे येथील खानदेशवासीयांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले.

यापूर्वी खानदेश एक्स्प्रेसला विरार थांबा देण्यात आलेला होता. या कारणास्तव वसई-विरार भागात राहणाऱ्या खानदेशी रहिवाशांना दिलासा मिळाला होता. खानदेश एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस असते. या गाडीला वसई-विरारमधून उत्तम प्रतिसाद मिळत असतो.

याच पार्श्‍वभूमीवर उर्वरित नसलेल्या दिवशी एका नवीन गाडीची मागणी वाढू लागली. मागणीची दखल घेऊन ०९०५१/०९०५२ ही मुंबई सेंट्रल ते भुसावळ स्पेशल गाडी वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आली; परंतु या गाडीला विरार थांबा देण्यात आलेला नव्हता.

या गोष्टीची दखल घेत माजी नगरसेविका सुरेखा कुरकुरे, खानदेश मित्र मंडळाचे अध्यक्ष कैलास पाटील, उपाध्यक्ष बाळू पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच अर्नाळ्याचे सतीश पाटील या सर्वांच्या वतीने रेल्वेला सातत्याने पत्रव्यवहार करण्यात आला होता.

मागणीला यश मिळाले असून शुक्रवारी गाडी क्रमांक ०९०५१ ला विरार स्थानकावर थांबा देण्यात आला. याचे खानदेश मित्र मंडळाच्या सदस्यांनी जल्लोषात स्वागत केले. या वेळी सुरेखा कुरकुरे यांच्या हस्ते मोटरमनला पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Jewellery: सोन्याचे दागिने महागणार? हॉलमार्किंग शुल्कात तब्बल 67% वाढ; बिल किती वाढणार?

Pune-Bengaluru Highway Update : कराड उड्डाणपुलाचे काम पूर्ण, पण पुलाखालील 'अतिक्रमणांचे ग्रहण' सुटणार कधी? महामार्ग विभागासमोर मोठे आव्हान

सव्वा पायलीचा भात, नऊ भाज्या आणि... माहेरवाशीण नाही बांदेकरांकडे सुना बसवतात गौरी, पूजा बिरारी म्हणते-

Latest Marathi News Update : अकोल्यात अवैध जुगार अड्ड्यावर खदान पोलिसांची धाड; २७.६२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Social Media Addictive Features: ‘सोशल मीडिया’वर नियंत्रण शक्य? वापर कमी करण्यासाठी उपाय हवेत : उच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT