railway Khar Road station work 50 percent complete MRVC mumbai sakal
मुंबई

Mumbai : खार रोड स्थानकाचे काम ५० टक्के पूर्ण !

२७० मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मचे काम ६० टक्के; तर एलिव्हेटेड डेकचे काम ५० टक्के पूर्ण !

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पश्चिम - हार्बर मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या खार रोडमधील गर्दी नियोजनासाठी होम फलाट, प्रशस्त डेक आणि सरकते जिने उभारण्याचे काम ५० साधारणपणे टक्के पूर्ण झाले. डाऊन हार्बर मार्गासाठी २७० मीटर लांबीचा प्लॅटफॉर्मचे काम ६० टक्के आणि एलिव्हेटेड डेकचे ५० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून (एमआरव्हीसी) देण्यात आली.

ब्रिटिशांनी उभारलेल्या रेल्वे स्थानकात खार रोडचा समावेश होतो. या स्थानकापासून वांद्रे टर्मिनस जवळ आहे. यामुळे पश्चिम रेल्वे, हार्बर रेल्वे आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी प्रवास करणाऱ्यांची स्थानकात मोठी वर्दळ असते.

स्थानकातील रोजची सरासरी प्रवासी संख्या १ लाख ६२ हजार च्या घरात आहे. काळानुरूप प्रवासी वाढले असले तरी स्थानकात आवश्यक बदल झालेले नसल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. हे टाळण्यासाठी आणि वाढती गर्दी नियोजनासाठी स्थानकात होम फलाट, प्रशस्त डेक आणि सरकते जिने अशा अनेक सुविधांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.

मधल्या काळात मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून (एमआरव्हीसी) खार स्थानकाच्या सुधारणा आराखड्याला मंजुरी मिळताच वेगाने काम सुरू करण्यात आले आहे. नव्याने उभारण्यात येत असलेल्या डेकला स्थानकातील सर्व पुलांची जोडणी देण्यात येणार आहे. प्रशस्त अशा या कामाला पूर्णत्वास जाण्यासाठी जून २०२४ उजाडणार असल्याचे एमआरव्हीसीकडून सांगण्यात आले.

ही कामे प्रगतीपथावर

- स्थानकावर डेक आणि अतिरिक्त प्लॅटफॉर्म काम ६० टक्के पूर्ण

- एकूण १० सरकते जिने उभारण्यात येणार असून यापैकी ४ जिन्यांची कामे पूर्ण

- एकूण दोन तिकीट बुकिंग कार्यालयापैकी एक पूर्ण तर दुसऱ्या बुकिंग कार्यालयाचे काम चालू

- ४ उद्वाहकांची (लिफ्ट) कामे चालू

- डेकवरील स्वच्छतागृहे काम सुरू

- टर्मिनसपर्यंत जाण्यासाठी खार ते वांद्रे टर्मिनस दरम्यान ४४ मीटर लांबीचा पादचारी पूल आधीच बांधण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT