mega block in mumbai sakal
मुंबई

Mumbai Mega Block : रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक!

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी १४ जानेवारी २०२४ रोजी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी १४ जानेवारी २०२४ रोजी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील वडाळा रोड ते मानखुर्द अप-डाऊन मार्गावर तर, पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ ते गोरेगाव अप- डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे ते कल्याण पाचव्या सहाव्या मार्गिकेवर शनिवारी- रविवारी मध्य रात्री मेगाब्लॉक असणार आहे.

पश्चिम रेल्वे -

  • कुठे - सांताक्रूझ ते गोरेगाव अप- डाऊन जलद मार्गावर

  • कधी - सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यत

परिणाम -

या ब्लॉकदरम्यान अप-डाउन जलद मार्गावरील लोकल सेवा सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. तर बोरिवली आणि अंधेरीकडे जाणाऱ्या काही गाड्या हार्बर मार्गावरील गोरेगाव स्थानकापर्यंत धावतील. तर काही उपनगरीय लोकल गाड्या रद्द राहतील.

हार्बर मार्गावर -

  • कुठे- वडाळा रोड ते मानखुर्द अप- डाऊन हार्बर मार्गावर

  • कधी- सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यत

परिणाम -

या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेलसाठी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सुटणाऱ्या सीएसएमटीअप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वांद्रे/गोरेगाव दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार चालवल्या जातील. याशिवाय ब्लॉक कालावधीत पनवेल ते मानखुर्द दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

मध्य रेल्वे -

  • कुठे- ठाणे- कल्याण पाचव्या सहाव्या अप - डाऊन जलद मार्गावर

  • कधी- शनिवारी रात्री ११.४० ते रविवारी पहाटे ३.४० वाजेपर्यंत

परिणाम -

या ब्लॉकदरम्यान सहाव्या मार्गावर धावणाऱ्या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण/दिवा आणि विद्याविहार दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील तर पाचव्या मार्गावर चालणाऱ्या डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या विद्याविहार आणि दिवा/कल्याण दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. तसेच दोन्ही दिशेने निर्धारित वेळेच्या १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT