Mumbai Mega Block sakal
मुंबई

Mega Block : रेल्वेच्या मेगा ब्लॉक मुळे मुंब्रा, दिवा, कोपर वासियांचे मेगा हाल

आज सकाळी 11 वाजल्या पासून ते संध्याकाळी 5 वाजे पर्यंत धिम्या मार्गावर असणाऱ्या मेगा ब्लॉक मुळे मुंब्रा, दिवा, कोपर वासियांचे मेगा हाल झाले आहेत. ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील मेगा ब्लॉक मुळे नागरिकांची किमान अर्धा ते एक तास रखडपट्टी झाली आहे

सकाळ वृत्तसेवा

दिवा - आज सकाळी 11 वाजल्या पासून ते संध्याकाळी 5 वाजे पर्यंत धिम्या मार्गावर असणाऱ्या मेगा ब्लॉक मुळे मुंब्रा, दिवा, कोपर वासियांचे मेगा हाल झाले आहेत. ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील मेगा ब्लॉक मुळे नागरिकांची किमान अर्धा ते एक तास रखडपट्टी झाली आहे. हा मेगा ब्लॉकमुळे कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर आणि ठाकुर्ली वरील नागरिकांना त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे.

रविवार म्हटलं की मुंबई, ठाण्यात कामाला येणाऱ्या 40 ते 50 टक्के नागरिकांचा सुट्टीचा दिवस असतो. पण त्यामुळे रेल्वे नेहमी रविवारीच मेगा ब्लॉक घेत असते. या मेगा ब्लॉक मध्ये रेल्वेतील तांत्रिक कामे, ट्रॅकची कामे, पेंटाग्राफची कामे केली जातात. पण त्याचा फटका नागरिकांना नक्कीच बसतो.

आजच्या दिवशी रेल्वेने घेतलेल्या मेगा ब्लॉक मुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळालेले आहे. त्यांना एक ते दिड तास कल्याण, डोंबिवली, दिवा आणि ठाण्यामध्ये लोकलची वाट पहावी लागली आहे. त्यानंतर कल्याणच्या पुढून भरुन आलेल्या लोकल मध्ये चढायला न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. त्यात ही जलद अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सुरु असल्याने ती जलद लोकल पकडण्यासाठी नागरिकांचा एकच गोंधळ उडाला.

मुंब्र्यात अप, डाऊनच्या धिम्या मार्गांवरील लोकल न थांबल्याने तेथील नागरिकांनी रिक्षाने दिवा गाठून नंतर मुंबई आणि कल्याण कडे लोकलने प्रवास केला. तर दिवा वासियांना जलद मार्गावरील फलाट चार व तीन वरुन लोकलने प्रवास करताना मुंब्र्या वरुन आलेल्या प्रवाशांमुळे चेंगराचेंगरी झाली.

तसेच दिव्यातील फलाटांवर धिम्या मार्गावरील लोकल सेवा बंद असल्याच्या सारख्या उद्घोषणा हाेत होत्या. तसे असतानाही प्रवाशी फलाट एक, दोन वर थांबून नंतर जलद मार्गावर लोकल येताच स्वतःचा जीव धोक्यात घालून ट्रॅकवर उतरुन उटल्या बाजूने जलद लोकल पकडत होते. कोपरला ही धिम्या लोकल न थांबल्याने नागरिकांनी डोंबिवली वरुनच पुढील प्रवास केला. तर काही कोपर वासियांनी कोपर ते डोंबिवली ट्रॅकवरुन प्रवास करुन डोंबिवली गाठले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याला गती; विक्रोळीत टनेल बोरिंग मशीनचा ३५० टनांचा कटरहेड यशस्वीपणे बसवला

MHADA E-Auction: म्हाडाच्या व्यावसायिक व कार्यालयीन गाळ्यांचा ई-लिलाव; २० मेपासून नोंदणी, २४ जूनला ऑनलाइन बोली

Mira Bhayandar Virar Metro: मिरा-भाईंदर ते विरार मेट्रोसाठी १७,७२४ कोटींचा नवा प्रस्ताव; मार्ग बदलून २४.९ किमी, १७ स्थानकांची योजना

Mumbai Suburban Upgrade: दादर स्थानकावर ३४ वर्षांनंतर सिग्नल यंत्रणेचा कायापालट

SCROLL FOR NEXT