Mumbai Mega Block sakal
मुंबई

Mega Block : रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक: प्रवाशांचे होणार हाल!

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी ४ फेब्रुवारी २०२४ रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी ४ फेब्रुवारी २०२४ रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर, तर ट्रान्स हार्बर मार्गावरील वाशी ते नेरुळ अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते बोरिवली अप- डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे -

कुठे- सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर

कधी- सकाळी १०. ५५ ते दुपारी ३.५५पर्यंत

परिणाम -

या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या गाड्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांत थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकापासून डाउन मार्गावर वळवण्यात येतील. तर घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धीम्या सेवा विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकावर थांबतील.

ट्रान्स-हार्बर -

कुठे - ठाणे-वाशी/नेरळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर

कधी - सकाळी ११. १० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत

परिणाम -

ब्लॉक कालावधीत ठाणे येथून वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या आणि वाशी/नेरुळ/पनवेल येथून ठाणे करीता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पश्चिम रेल्वे -

कुठे - अंधेरी ते बोरिवली अप- डाऊन जलद मार्गावर

कधी - सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यत

परिणाम -

या ब्लॉकदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावरील सर्व लोकल अंधेरी ते बोरिवली दरम्यान धिम्या मार्गावरुन चालविण्ंयात येणार आहेत. तसेच अप आणि डाउन मार्गावरील काही लोकल रद्द केल्या आहेत. याशिवाय हार्बर मार्गावरील काही बोरिवली आणि अंधेरी लोकल गोरेगावपर्यंत चालवण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT