Railway megablock sakal media
मुंबई

मुंबई : रविवारी, तिन्ही रेल्वे मार्गावर ब्लॉक

कुलदीप घायवट

मुंबई : रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायर यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी (Railway repairing work) रविवारी, (ता.30) रोजी मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. तर, पश्चिम रेल्वेवर (Western railway) शनिवार-रविवारी रात्रकालीन ब्लॉक घेतला जाईल. पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन ब्लॉक नसेल.

कुठे : सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धिम्या मार्गावर

कधी : सकाळी 10.55 ते दुपारी 3.55

परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळविण्यात येईल. परिणामी, या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे धिम्या मार्गावर वळवल्या जातील. 

कुठे : पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर (बेलापूर- खारकोपर सेवा प्रभावित नसतील; नेरुळ- खारकोपर सेवा रद्द)

कधी : सकाळी 9.45 ते सायंकाळी 4.25 पर्यंत

परिणाम : हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते बेलापूर/पनवेल अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द असेल. ट्रान्स हार्बर मार्गावरील पनवेल ते ठाणे अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द असेल. नेरुळ ते खारकोपर मार्गावरील अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द असेल. ब्लॉक कालावधीत बेलापूर आणि खारकोपर दरम्यान लोकल वेळापत्रकानुसार धावतील. सीएसएमटी - वाशी सेक्शनमध्ये विशेष लोकल चालविण्यात येतील. ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा उपलब्ध असतील.

कुठे : वसई रोड ते वैतरणा अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : शनिवारी रात्री 11.50 ते रविवारी पहाटे 4.30 पर्यंत

परिणाम : वसई रोड ते वैतरणा अप आणि डाऊन जलद मार्गावर रात्रकालीन ब्लॉक असेल. ब्लॉकवेळी गाडी क्रमांक 09101 विरार-भरूच मेमू नियमित पहाटे 04.35 वाजेऐवजी 15 मिनिटे उशिराने धावेल. त्यामुळे विरारहून ही गाडी 4.50 वाजता सुटेल. तर, रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लॉक घेतला जाणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT