मुंबई

एसी लोकलचे तिकीट दर 31 मेपर्यंत जैसे थे 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - पश्‍चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या पहिल्या एसी लोकलच्या तिकीट दरात 31 मे पर्यंत कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या तिकीट दरात येत्या 24 मे पासून वाढ करण्यात येणार होती. रेल्वे मंत्रालयाचा हा निर्णय किमान काही दिवसांकरिता का होईना मुंबईकरांसाठी दिलासादायक ठरला आहे. 

डिसेंबर 2017 पासून उपनगरीय मार्गावरील देशातील पहिली एसी लोकल सुरू झाल्यानंतर या लोकलच्या तिकीट दरात 25 जून 2018 पासून वाढ करण्यात येणार होती. परंतु तेव्हा 6 महिन्यांसाठी भाडेवाढ पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे गेल्या डिसेंबर महिन्यापासून भाडेवाढ होण्याचे संकेत होते. परंतु रेल्वे मंत्रालयाने पुन्हा एकदा भाडेवाढीला 4 महिने स्थगिती दिली. त्यानंतर आता पुन्हा एकदा एसी लोकलचे तिकीट दर 31 मे पर्यंत जैसे थे ठेवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला असल्याचे पश्‍चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले. 

चर्चगेट ते विरारदरम्यान एसी लोकलच्या 12 फेऱ्या चालविण्यात येतात. एसी लोकलचे पहिल्या सहा महिन्यांसाठीचे किमान तिकीट जीएसटीसह 60 रुपये; तर कमाल तिकीट 205 

रुपये ठेवण्यात आले होते. 2018-19 या आर्थिक वर्षात एसी लोकलमुळे 19 कोटी रुपयांचा महसूल पश्‍चिम रेल्वेच्या तिजोरीत जमा झालेला आहे; तर एकट्या एप्रिल महिन्यात 1 कोटी 84 लाखांचा महसूल प्राप्त झालेला आहे. 

जादा थांब्यामुळे महसुलात वाढ 
पश्‍चिम रेल्वेच्या 1 नोव्हेंबर 2018 पासून लागू करण्यात आलेल्या नवीन वेळापत्रकात एसी लोकलच्या थांब्यात वाढ केलेली आहे. त्यामध्ये मरीन लाईन्स, चर्नी रोड, ग्रॅण्ट रोड, दहिसर, मिरा रोड, नायगाव आणि नालासोपारा स्थानकांचा समावेश आहे. एसी लोकलच्या थांब्यात वाढ केल्यामुळे पश्‍चिम रेल्वेच्या महसुलात वृद्धी झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marriage Rules: महाराष्ट्रात लग्नाचे नियम बदलणार! लग्नपत्रिकेत वर-वधुची जन्मतारीख बंधनकारक होणार? बालहक्क आयोगाची मोठी शिफारस

Latest Marathi News Update: झोजिला खिंडीजवळील शैतान नल्ला येथे हिमस्खलनामुळे अनेक वाहने सापडली

IPL 2026 : वैभव सूर्यवंशीचं वादळी शतक अन् RR चा धावांचा डोंगर! कमिन्सच्या नेतृत्वात SRH पहिला विजय मिळवणार?

Board Exam Result: महाराष्ट्र बोर्डाच्या १०वी आणि १२वी निकालावर संकट! निकाल उशिरा लागण्याची शक्यता; कारण काय?

Video: पुण्यात भयंकर प्रकार! मद्यपीने बस हायजॅक करुन विरुद्ध दिशेने पळवली; रहदारीच्या रस्त्यावर थरार

SCROLL FOR NEXT