railway sakal
मुंबई

Railway News: मुंबई ते गोरखपुर-दानापुर दरम्यान अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या

सकाळ वृत्तसेवा

Railway News: उन्हाळी सुट्टयांमुळे मुंबईतून उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई-गोरखपुर आणि मुंबई-दानापुर दरम्यान अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईतून उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ट्रेन क्रमांक ०१०८३लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपुर विशेष ट्रेन शनिवारी २० एप्रिल २०२४ रोजी रात्री ११:५० वाजता एलटीटी येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ०९:३० वाजता गोरखपुर येथे पोहोचेल.

ट्रेन क्रमांक ०१०८४ उन्हाळी विशेष गाडी सोमवारी २२ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ३.३० वाजता गोरखपुर येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी रात्री १२.२५ वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०१०८५ विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई रविवारी २१ एप्रिल २०२४ रोजी रात्री ११:५० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ९:३० वाजता गोरखपुर येथे पोहोचेल.

ट्रेन क्रमांक ०१०८६ विशेष गाडी मंगळवारी २३ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ३.३० वाजता गोरखपुर येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी रात्री १२.२५ वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०१०८१ एलटीटी -दानापुर विशेष गाडी रविवारी २१ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७ वाजता दानापुर येथे पोहोचेल.

ट्रेन क्रमांक ०१०८२ विशेष गाडी सोमवारी २२ एप्रिल २०२४ रोजी रात्री ८ वाजता दानापुर येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ४.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. या तिन्ही गाड्यांचे आरक्षण १९ एप्रिल २०२४ रोजी भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरु होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मोठा दावा... "चेन्नई सुपर किंग्स Playoff च्या शर्यतीतून बाहेर पडल्यावरच MS Dhoni खेळणार! कदाचित तो निरोपाचा सामना"

Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार ! बंगला भाड्याने घेऊन गार्डनमध्ये सुरू केली गांजाची शेती, तरुणाला अटक

Latest Marathi News Live Update : उष्माघातापासून वाहनचालकांना दिलासा, उद्यापासून बदलापुरातील सर्व सिग्नल दुपारी बंद राहणार

Dead Whale Found Are Ware Beach : 20 फूट लांब आणि 10 फूट रुंद! कोकणच्या किनाऱ्यावर महाकाय व्हेल मासा मृतावस्थेत; 4 तासांच्या थरारानंतर विल्हेवाट

Pune Vande Bharat Accident : सिद्धेश्वर, उद्यानसह दक्षिण भारताकडे जाणाऱ्या गाड्यांना मोठा फटका! वंदे भारत दुर्घटनेनंतर रेल्वे विस्कळीत, 7 तास उशिरा गाड्या

SCROLL FOR NEXT