Railway News  sakal
मुंबई

Railway Crime: रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने जळगावच्या तरुणाची मुंबईत फसवणूक

बनावट नियुक्तिपत्राचा जाळ्यात: जळगावच्या तरुणाला २५ हजारांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा

Railway News: रेल्वेत उद्‌घोषक पदावर नोकरीला लावण्याच्या बहाण्याने जळगाव येथील आशीष पाटील (वय ३२, रा. पाचोरा) याला रेल्वेचे बनावट नियुक्तिपत्र देऊन त्याच्याकडून २५ हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघड झाला आहे.

डॉ. एम. के. शहा व संदीप पाठक अशी फसवणूक करणाऱ्यांची नावे आहेत. सीबीडी पोलिसांनी या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

आशीषचे विज्ञान शाखेत पदवीपर्यंत शिक्षण झाले असून तो नोकरीच्या शोधात होता. बेलापूर येथील डॉ. एम. के. शहा यांचा मित्र संदीप पाठक हा रेल्वेमध्ये नोकरीला असून तो रेल्वेमध्ये उद्‌घोषकपदावर नोकरी लावून देत असल्याची माहिती आशीषला त्याच्या मित्राने दिली होती.

त्यानुसार आशीषने शहा यांना संपर्क साधून चौकशी केली असता डॉ. शहा यांनी त्याला रेल्वे विभागातील या नोकरीसाठी २५ हजार रुपये आधी द्यावे लागतील. तसेच काम झाल्यानंतर बाकी पैसे द्यावे लागतील, असे सांगितले होते.

२७ नोव्‍हेंबरला नियुक्तिपत्र तयार झाल्याचे सांगून त्याला बेलापूरला बोलावले. तेथे एका तरुणाने नियुक्तिपत्र न देता मोबाईलवर त्याचे छायाचित्र काढून घेण्यास सांगितले.

त्यानंतर आशीषला प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आल्यानंतर त्याच्याकडे असलेले नियुक्तिपत्र बनावट असल्याचे त्याला समजले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आशीषने सीबीडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT