Railway News sakal
मुंबई

Railway News: मध्य रेल्वेची 'वॉचटॉवर' संकल्पना कोमात; प्रयत्न अपयशी

सकाळी आणि संध्याकाळी अनेक स्थानकांच्या प्लॅटफॉर्म, पादचारी पूल मोठ्या प्रमाणात गर्दी |In the morning and evening many station platforms, footbridges are heavily crowded

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Local News: रेल्वे स्थानकांवरी गर्दीवर नियंत्रण लक्ष ठेवण्यासाठी आणि चेंगराचेंगरीची घटना होऊ नयेत म्हणून रेल्वे पोलिसांकडून दादर रेल्वे स्थानकांवर 'वॉचटॉवर'च्या उपक्रम सुरु केला होता.

काही दिवसात इतर गर्दीच्या स्थानकात वॉचटॉवर उभारण्यात येणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले होते. मात्र, दोन वर्षाच्या आता हा उपक्रम बंद पडल्याचे चित्र आहेत.

दररोज उपनगरीय लोकलमधून ३० ते ३५ लाख प्रवासी प्रवास करतात. सकाळी आणि संध्याकाळी अनेक स्थानकांच्या प्लॅटफॉर्म, पादचारी पूल मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या गर्दीच्या फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडतात. तर चेंगराचेंगरी होण्याची शक्यता असते.

त्यामुळे प्रवासी सुरक्षा लक्षात घेऊन मध्य रेल्वेने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि गर्दीमुळे घडणाऱ्या गुन्हे रोखण्यासाठी जून २०२२ मध्ये 'वॉचटॉवर' नावाचा संकल्पना आणली होती. प्राथमिक स्वरूपात दादर स्थानकात या उपक्रमास सुरुवात झाली. मात्र हा काही महिन्यातच ही संकल्पना अपयशी ठरला असून दादर स्थानकात वॉचटॉवर नजरेस पडत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

तर दुसऱ्या बाजूला पुढील काही दिवसात इतर गर्दीच्या स्थानकात वॉचटॉवर उभारण्यात येणार असल्याचे सांगूनही अद्याप एकही रेल्वे स्थानकावर 'वॉचटॉवर' उभारण्यात आलेला नसल्याची माहिती प्रवासी संघटनेकडून देण्यात आली आहे.

काय आहे 'वॉचटॉवर ? (what is watch tower)

गर्दीच्या वेळेत रेल्वे सुरक्षा दलाकडून लाऊडस्पीकर असलेल्या उंच खुर्चीवर बसून स्थानकात टेहळणी करण्यात येणार होती. तर याद्वारे प्रशासनाकडून प्रवाशांची सुरळीत हालचाल तसेच स्थानक आणि पादचारी पुलांवरील गर्दी नियंत्रण इत्यादी गोष्टींवर लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

परंतु गर्दीच्या दादर स्थानकावर हा प्रकल्प अपयशी ठरला असून इतर स्थानकांवर उभारण्यात येणाऱ्या वॉचटॉवर बाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT