Railway News  esakal
मुंबई

Railway News: दाट धुक्याचा रेल्वेला फटका; गाड्या धावतायेत उशीराने

Railway News: लोकल वेळापत्रकानुसार चालविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दिवसभरात काही लोकल रद्द केल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Railway News: गेल्या काही दिवसांपासून धुक्यामुळे लोकलसह मेल-एक्सप्रेसची वाहतूकीला लेटमार्क लागत आहे. शुक्रवारी पहाटे कसारा-कर्जत परिसरात धुक्याची चादर पसरल्याने लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने तर लांब पल्याच्या मेल -एक्सप्रेस एक तासापेक्षा जास्त विलंबाने धावत होत्या. वसई-विरार भागातील धुक्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल देखील उशिराने धावत होत्या. त्याचा फटका प्रवाशांना बसला.

धुक्यामुळे रेल्वेच्या वाहतुकीला लेटमार्क लागू नये यासाठी मध्य रेल्वेने धुके सुरक्षा यंत्रणेचा वापर करण्यास सुरुवात केली. परंतु त्याच्या रेल्वेला फायदा होताना दिसून येत नाही आहे. गेल्या काही दिवसांपासून दाट धुक्यामुळे अनेक मेल- एक्सप्रेस गाडयांना फटका बसतो आहे. त्यामुळे मेल-एक्सप्रेस गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावत असल्याने त्यांच्या परिणाम थेट उपनगरीय लोकल सेवनावर होताना दिसून येत आहे.

शुक्रवारी पहाटे कसारा-कर्जत परिसरात धुक्याची चादर पसरल्याने लांब पल्याच्या मेल -एक्सप्रेस गाड्या आपल्या निर्धारित वेळापेक्षाही विलंबाने धावत होत्या.या गाड्या उपनगरीय लोकल मार्गावर वळविण्यात आल्याने अँप जलद मार्गावरील लोकलवर परिणाम झाला होता. सकाळपासून मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील लोकल १५ ते २० मिनिटे आणि मेल-एक्सप्रेस एक तासापेक्षा जास्त विलंबाने धावत होत्या. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या.

कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे दुपारपर्यंत चर्चगेट, मुंबई सेंट्रल, वांद्रे आणि सीएसएमटी,दादर,कुर्ला, एलटीटीकडे येणाऱ्या लोकल विलंबाने धावत असल्याने स्थानक आणि लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.लोकल वेळापत्रकानुसार चालविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दिवसभरात काही लोकल रद्द केल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: श्रेयस अय्यरचे शतक, जिंकूनही पंजाब किंग्सची प्ले ऑफमधील जागा पक्की नाहीच... जाणून घ्या समीकरण

IPL 2026 KKR Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्ससमोर अवघड गणित! पंजाबला नेट रन रेटमध्ये मागे टाकायचे असेल तर...

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

SCROLL FOR NEXT