railway bribe  sakal
मुंबई

Railway News: उच्च पदस्थ अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना सीबीआयकडून अटक!

वाशी येथील रहिवासी तक्रारदाराकडून 50000 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा दावा केला होता.

Chinmay Jagtap

मुंबई, ता.23: सीबीआयने पश्चिम रेल्वेत कार्यरत मुख्य कार्यालय अधीक्षकाला शुक्रवारी 50000 रुपयांची लाच स्विकारल्या प्रकरणी अटक केली आहे.

संजय वाघेला असे आरोपी रेल्वे अधिकाऱ्याचे नाव आहे.सीबीआयच्या माहितीनुसार गुरूवारी 22 फेब्रुवारी रोजी सीबीआयला वाघेला यांच्या विरोधात तक्रार प्राप्त झाली होती.

ज्यात वाशी येथील रहिवासी तक्रारदाराकडून 50000 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा दावा केला होता.

या प्रकरणी तक्रारदार हा खाजगी कंपनीत लायझनिंग एजंट म्हणून कार्यरत आहे. संबंधित कंपनी पश्चिम रेल्वेला रेल्वेशी संबंधित विविध साहित्याचा पुरवठा करते आहे. ही कंपनी पश्चिम रेल्वेची नियमित साहित्य पुरवठा करणारी कंपनी आहे. पश्चिम रेल्वेला पुरवलेल्या साहित्याचा मोबदला मिळवण्यासाठी तक्रारदार त कंपनीच्या वतीने पश्चिम रेल्वेच्या लेखा विभागाकडे पाठपुरावा करत होता.

अलीकडेच, कंपनीने पश्चिम रेल्वेला साहित्याचा पुरवठा केला. तसेच पुरवलेल्या साहित्याची. 4.80 कोटी रुपयांची तीन बिले पश्चिम रेल्वेच्या लेखा विभागाकडे सादर केली.

वाघेला हे पश्चिम रेल्वे कार्यालयाच्या लेखा विभागात प्रक्रिया अधिकारी आहेत, मुंबई सेंट्रल येथील पश्चिम रेल्वेच्या कार्यालयात 15.

फेब्रुवारीला तक्रारदार वाघेला यांना भेटायला गेले होते. भेटी दरम्यान वाघेला यांनी बिल पास करण्यासाठी लाच मागितली. या संदर्भात तक्रारदार यांनी सीबीआयकडे लेखी तक्रार दिलीं.

यानंतर तक्रारीत नमूद केलेल्या आरोपाची शहानिशा करण्यात आली. आरोपांच्या शहानिशे नंतर लाच मागितल्याची पुष्टी झाली.

सीबीआयने सापळा रचून आरोपी अधिकाऱ्याला मुंबई येथील कार्यालयात 50 हजार रुपयांची लाच घेताना पकडले.

आरोपीशी संबंधित 2 ठिकाणी झडती घेण्यात आली, ज्यात कागदपत्रे दस्तावेज इत्यादी जप्त करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीला शुक्रवारी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

ANAYA BANGAR: "माझं क्रिकेट संपलं वाटलेलं, पण अनाया बांगर हिचं मैदानात दमदार पुनरागमन! 'या' देशाने दिला ग्रीन सिग्नल, महिला लीग गाजवणार?

SCROLL FOR NEXT