Railway News sakal
मुंबई

Mumbai Railway News: टीसींच्या नावे नवा विक्रम; प्रत्येकाने वसूल केला एक कोटी रुपयांचा दंड!

Railway News: अनियमित तिकिटांच्या १०,६८६ प्रकरणांमधून दंडाद्वारे १ कोटी रुपयांचा महसूल मिळवून एक नवा विक्रम स्थापित केला आहे. हा रेल्वे मंडळाच्या उत्पन्नातील प्रवासी महसूलाचा मोठा वाटा आहे.

सकाळ वृत्तसेवा

Railway News: विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेकडून तिकीट तपासणी केली. परंतु फुकटे प्रवासी सुधारत नाही.

या फुकट्या प्रवाशांना टीसींनी चांगला धडा शिकवला असून त्यांच्याकडून कोट्यवधींचा दंड वसूल केला आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या तीन तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी एक कोटी रुपयांच्या महसुली उत्पन्नाचा टप्पा ओलांडला आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात प्रवासी तिकीट निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले मोहम्मद शम्स चांद यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षात अवैध आणि अनियमित तिकिटांच्या १०,६८६ प्रकरणांमधून दंडाद्वारे १ कोटी रुपयांचा महसूल मिळवून एक नवा विक्रम स्थापित केला आहे. हा रेल्वे मंडळाच्या उत्पन्नातील प्रवासी महसूलाचा मोठा वाटा आहे.

मोहम्मद शम्स चांद यांनी यापूर्वी २०२१-२२ या आर्थिक वर्षात १.२५ कोटी रुपयांची महसुली उत्पन्नाची अशीच कामगिरी केली होती.

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये  मुंबई विभागात चांद यांच्यासह  तिकीट तपासणीच्या एक कोटीच्या क्लबमध्ये १०,४२८ प्रकरणांमधून १,००,०२,८३० रुपयांच्या महसूल मिळवणारे मुख्य तिकीट निरीक्षक सुनील नैनानी आणि ११,३६७ प्रकरणांमधून १,०१,३२,८७० च्या महसूल मिळवणारे मुख्य तिकीट निरीक्षक एम एम शिंदे यांचा समावेश आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT