Dombivli  saakl
मुंबई

Railway News: डोंबिवली रेल्वे स्थानकातील पादचारी पूल बंद

फलाट क्रमांक तीन, चारवरील जीना रविवारपासून बंद

शर्मिला वाळुंज

डोंबिवली रेल्वे स्थानकातील मुंबई दिशेकडील पादचारी पुलांना जोडणाऱ्या फलाट क्रमांक तीन आणि चार वरील जिन्याच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी 30 डिसेंबरला रात्री 11 वाजल्यापासून हा जिना प्रवाशांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 40 दिवस हे काम सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले असून तेवढे दिवस प्रवाशांनी पर्यायी जिन्याचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

डोंबिवली रेल्वे स्थानकातील मुंबई दिशेकडील फलाट क्रमांक 3 व 4 येथील उतरत्या जिन्याच्या दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. 31 डिसेंबर पासून या कामाची दुरुस्ती करण्यात येणार असून या दुरुस्तीच्या कालावधीत प्रवाशांनी कल्याण दिशेकडील किंवा मिडलला असलेल्या डोंबिवली रेल्वे स्थानकातील जिन्यांचा वापर फलाट क्रमांक तीन किंवा चारवर चढ, उतार करण्यासाठी करावा. तसेच प्रवाशांनी फलाटावरून पादचारी पुलावर चढणे किंवा उतरण्यासाठी या भागातील सरकत्या जिन्यांचा वापर करावा, असे आवाहन रेल्वेच्या वरिष्ठ बांधकाम अभियंत्याने केले आहे.

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवरून मुंबईकडे धावणाऱ्या धिम्या किंवा जलद लोकल धावतात. त्यामुळे या फलाटावार पहाटेपासून रात्री आठ वाजेपर्यंत प्रवाशांची गर्दी असते. फलाट क्रमांक 4 वरून मुंबईकडून कल्याणकडे जाणाऱ्या जलद लोकल धावतात. संध्याकाळच्या वेळेत मुंंबईतून कामावरून निघालेला बहुतांशी नोकरदार जलद लोकलना पसंती देतो.

त्यामुळे संध्याकाळच्या वेळेत फलाट क्रमांक चारवर प्रवाशांची सर्वाधिक गर्दी असते. या प्रवाशांना रविवार नंतर डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन किंवा चारवर उतरल्यानंतर कल्याण बाजू किंवा सीएसएमटी बाजूकडील सरकात जिना, नियमितच्या जिन्याने इच्छित स्थळी जावे लागणार आहे. प्रवाशांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्यायी जिन्यावरून जाताना झुंबड करू नये, गर्दी टाळावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांची सकाळ, संध्याकाळची वाढती गर्दी विचारात घेऊन रेल्वे प्रशासनाने रेल्वे सुरक्षा जवानांना प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि या भागात होणारी प्रवाशांची झुंबड विचारात घेऊन येथील पाचचारी पुलावर सकाळ, संध्याकाळ तैनात राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT