konkan raiwlay accident  sakal
मुंबई

Mumbai News: गर्दीने घेतला आणखी एक बळी, कोकणकन्येतून पडून प्रवाशाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: कोकणकन्या एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातून पडून एका तरुणांच्या मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दादर रेल्वे स्थानकांवर घडली आहे.अमित पवार असे मयत झालेल्या तरुणांचे नाव आहे. या घटनेनंतर कोकणातील रेल्वे प्रवाशांनी रेल्वेच्या कारभारावर संताप व्यक्त करत मुंबई शहरातून कोकणासाठी अतिरिक्त गाड्या सोडण्याची मागणी केलेली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतक अमित पवार हे कांदिवलीतील चारकोप परिसरात वास्तव्यास होते. कोकणातील गावी जाण्यासाठी गुरुवारी त्यांनी कोकणकन्या एक्स्प्रेसचा पर्याय निवडला. एक्स्प्रेसचे आरक्षण पूर्ण झाल्याने त्यांनी जनरल डब्यातून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कोकणकन्या प्लँटफॉर्म क्रमांक ११ वर येताच.

अमित पवार यांनी जनरल डब्याकडे धाव घेतली. परंतु, जनरल डब्यात प्रचंड गर्दी असल्याने त्यांना डब्यात प्रवेश करायला मिळाला नाही. त्यामुळे अमितने जनरल डब्याच्या दरवाज्यावरील पायदानावर लटकत त्यांनी प्रवास करण्याचा निर्णय घेतला. दादर स्थानकातील फलाटावरून गाडी सुटली. गाडीने वेग घेताच त्यांचा तोल गेला आणि फलाटाच्या टोकावर पडले आणि गाडीच्या चाकाखाली सापडले. या अपघात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. या प्रकरणी दादर रेल्वे पोलिस स्थानकात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे,

जीवावर उदार होऊन प्रवास करू नका -

उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकणात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. कोकणात जाणाऱ्या नियमित आणि विशेष रेल्वेगाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांनी मेल-एक्स्प्रेसच्या दरवाज्यात लटकून प्रवास करत आहे.

अनेकदा प्रवासी संघटनेने रेल्वे गाड्यांच्या गर्दी संदर्भात गाऱ्हाणे मांडले होते. मात्र, याकडे लक्ष देण्यात आले नाही. प्रवाशांनीही जीवावर उदार होऊन प्रवास करू नयेत. गाडीत खरंच जीवघेणी गर्दी असेल तर इतर पर्यायी रेल्वे किंवा बसचा वापर करावा असे आवाहन कोकण विकास समितीने प्रवाशांना केले आहे.

.........

गोरखपूर, दानापूर, मऊला गाड्या सोडण्याच्या घाईगडबडीत मध्य रेल्वेला चिपळूण, रत्नागिरी,सावंतवाडीचा विसर पडला. मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा दादर तर पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल किंवा वांद्रे टर्मिनस येथून कोकण रेल्वेवर एकही उन्हाळी विशेष गाडी न सोडल्यामुळे हे घडलेले आहे.

आतातरी प्रशासनाने झोपेतून जागे होऊन पश्चिम रेल्वेवरून रात्री सावंतवाडी तर मध्य रेल्वेवरून मध्यरात्री रत्नागिरी आणि सकाळी लवकर चिपळूण अशा गाड्या मुंबईतून (म्हणजे मुंबई शहरातून) सोडाव्यात अशी मागणी कोकण विकास समितीचे सदस्य अक्षय महापदी यांनी दैनिक सकाळशी बोलताना दिली आहे,.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT