railway station  esakal
मुंबई

Railway News: रेल्वे स्थानकांवर मिळणार ज्वारीचे पीठ अन् पापड!

सकाळ डिजिटल टीम

Railway News: रेल्वे प्रवास करताना स्थानिक खाद्यपदार्थ व तेथील प्रसिद्ध वस्तू खरेदीची इच्छा झाली तर ते आता सहज रेल्वे स्थानकावरच उपलब्ध होणार आहेत. दक्षिण-मध्ये रेल्वेने त्यांच्या १०९ स्थानकांवर ‘एक स्टेशन एक वस्तू’ हा उपक्रम सुरू केला असून, त्यात महाराष्ट्रातील २० स्थानकांचा समावेश आहे.

स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासोबतच उत्पादकांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने रेल्वे स्थानकांवर स्थानिक उत्पादनाचे स्टॉल सुरू करण्यात आले आहेत. या स्टॉलवर त्या-त्या परिसरातील प्रसिद्ध वस्तू, धान्य, खाद्य पदार्थ विक्रीस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

२० प्रमुख स्थानकांचा समावेश

दक्षिण-मध्य रेल्वेने महाराष्ट्रातील २० रेल्वे स्थानकांची ‘एक वस्तू, एक स्थानका’साठी निवड केली आहे. त्यात नांदेड, छत्रपती संभाजीनगर, हिमायतनगर, नागरसोल, मुदखेड आदींसह २० प्रमुख स्थानकांचा समावेश आहे. या स्थानकांवर त्या-त्या परिसरातील प्रसिद्ध वस्तू व खाद्य पदार्थांचे स्टॉल लावले जाणार आहेत. त्यात हातमागाचे उत्पादने, चटई, राजगिरा लाडू, ज्वारीचे पीठ, पापड आदींसह महाराष्‍ट्रातील प्रसिद्ध खाद्यपदार्थांचा व कलाकुसरीच्या वस्तूंचा समावेश आहे.

दक्षिण-मध्य रेल्वेच्या १०९ स्थानकांची निवड

दक्षिण मध्य रेल्वेने स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या १०९ स्थानकांची निवड केली आहे. त्यात महाराष्ट्रातील २०, तेलंगातील ३३, आंध्रप्रदेशातील ५३, आणि कर्नाटकातील २० स्थानकांचा समावेश आहे.

चार हजार २०० लाभार्थ्यांना व्यवसायाची संधी

दक्षिण-मध्य रेल्वेच्या १०९ स्थानकांवर १२० स्टॉल लावले जाणार आहेत. त्यातून चार हजार २०० लाभार्थ्यांना व्यावसायाची संधी मिळणार आहे. महाराष्ट्रातील २० स्थानकावरील २० स्टॉलवरून ७०० जणांना व्यवसायाची संधी मिळणार आहे. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहित करताना युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात असल्याचे दक्षिण-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अरूण कुमार जैन यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : देशातील पहिल्या पर्यटन पाणबुडीच्या बांधणीला सुरुवात; २०२७ मध्ये प्रकल्प पूर्ण होणार

Nagpur Raid: नागपूरमध्ये कामोत्तेजना वाढवणारं बोगस औषध उजेडात! 'या' कॅप्सुलचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाची रेड

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सीसीटीव्ही, डीएनए पुराव्यांवरून आरोपीचा खोटेपणा उघड; २५ जूनला निकाल

Strait of Hormuz Closed: पुन्हा मध्यपूर्वेत युद्धाची चिन्हे? होर्मुझ सामुद्रधुनी बंद; इराणचा मोठा निर्णय, दिला मोठा इशारा

IND vs AFG: यशस्वी जैस्वालचे खणखणीत शतक अन् मग विजयी षटकार... भारताचा अफगाणिस्तानला व्हाईटवॉश

SCROLL FOR NEXT