Railway Station esakal
मुंबई

Railway News: प्रवाशांना मिळणार दिलासा; मुंबई ते प्रयागराजदरम्यान विशेष रेल्वे गाड्या!

सकाळ वृत्तसेवा

Railway News: रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पश्‍चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस ते सुभेदारगंज स्थानकांदरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई ते प्रयागराज दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०४१२६ वांद्रे टर्मिनस- सुभेदारगंज स्पेशल वांद्रे टर्मिनस येथून दर मंगळवारी सकाळी ११ वाजता सुटून सुभेदारगंजला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता पोहोचेल. ही ट्रेन २७ फेब्रुवारी ते २६ मार्च २०२४ पर्यंत धावणार आहे.

तसेच ट्रेन क्रमांक ०४१२५ सुभेदारगंज-वांद्रे टर्मिनस स्पेशल सुभेदारगंज येथून दर सोमवारी सकाळी ५.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. ही ट्रेन २५ मार्च २०२४ पर्यंत धावणार आहे.

या ट्रेन बोरिवली, वापी, वलसाड, सुरत, वडोदरा, रतलाम, कोटा, सवाई माधोपूर, गंगापूर सिटी, बयाना, फतेहपूर सिक्री, आग्रा फोर्ट, तुंडला, इटावा, कानपूर सेंट्रल आणि फतेहपूर स्थानकावर दोन्ही दिशेने थांबेल. या विशेष गाड्यांचे आरक्षण भारतीय रेल्वेच्या सर्व आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीचे संकेस्थळावर सुरू झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka CM Resigns : कर्नाटकच्या राजकारणात भूकंप! सिद्धरामय्या यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; DK शिवकुमार होणार नवे CM, काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय

प्राजक्ता माळीने कान्सच्या रेड कार्पेटवर नेसलेली साडी कुठली आहे ठाऊक आहे? ठाण्यासोबत आहे खास कनेक्शन

वैभव सूर्यवंशी म्हणजे भारतीय क्रिकेट नाही! १५ वर्षीय खेळाडूला टीम इंडियात संधी देण्याच्या विरोधात उभा राहिला दिग्गज, म्हणाला...

अनुराग कश्यप यांच्या ‘बंदर’चं नवीन गाणं रिलीज; बॉबी देओलची भूमिका चर्चेत

Sinhgad Palace History : सिंहगडावरचा भव्यदिव्य राजवाडा कोणी विकला? थक्क करणारा इतिहास अन् दुर्मिळ फोटो पाहा

SCROLL FOR NEXT