Railway sakal media
मुंबई

Railway News: हिवाळ्या निमित्त मुंबईच्या दिशेने धावणार विशेष रेल्वे गाड्या

सकाळ डिजिटल टीम

हिवाळ्याच्या हंगामात रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस आणि गांधीधाम स्थानकांदरम्यान विशेष साप्ताहिक गाड्यांची वारंवारता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई ते गांधीधाम दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०९४१५ वांद्रे टर्मिनस- गांधीधाम स्पेशल वांद्रे टर्मिनस येथून दर गुरुवारी संध्याकाळी ७.२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.४० वाजता गांधीधामला पोहोचेल. ही ट्रेन ११ जानेवारी २०२४ ते २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत धावणार आहे.

तसेच ट्रेन क्रमांक ०९४१६ गांधीधाम – वांद्रे टर्मिनस स्पेशल गांधीधाम येथून दर गुरुवारी रात्री १२.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी २.२० वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. ही ट्रेन ११ जानेवारी २०२४ ते २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत धावणार आहे. ही ट्रेन दोन्ही दिशांना बोरिवली, वापी, सुरत, वडोदरा, अहमदाबाद, विरमगाम, ध्रांगध्रा, समखियाली आणि भचौ स्थानकावर थांबेल. या साप्ताहिक हिवाळी विशेष गाड्यांचे आरक्षण भारतीय रेल्वेच्या सर्व आरक्षण केंद्रावर आणि आयआरसीटीसीच्या संकेस्थळावर सुरु झाले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

'त्या'व्हायरल व्हिडीओवर अखेर गौतमी पाटील बोलली, म्हणाली... 'लाज नाही वाटली?'

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

Mumbai News: जीटीबीनगरवासीयांना भाड्याचा दिलासा! निवासींना २० तर गाळेधारकांना १० हजार रुपये

Pachod News : दावरवाडी परिसरातील सहा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रेच पडलीत आजारी!

SCROLL FOR NEXT