Railway Security Force body cameras to monitor criminal activity in Mail Express trains mumbai
Railway Security Force body cameras to monitor criminal activity in Mail Express trains mumbai sakal
मुंबई

Mumbai News : आरपीएफ जवानांच्या गणवेशात आता बॉडी कॅमेरे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : उपनगरीय लोकल आणि मेल-एक्सप्रेस रेल्वे गाड्यामध्ये गुन्हेगारी हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचा जवानांच्या गणेशवार आता बॉडी कॅमेरा लावण्याचा निर्णय आरपीएफ पोलिसांनी घेतला आहेत. येत्या महिन्याभरत हे ४० कॅमेरा मुंबई विभागात दाखल होणार आहे. त्यामुळे रेल्वे मार्गावरील गुन्ह्यांचा तपास करण्यास आरपीएफला मदत मिळणार आहे.

रेल्वे पोलिसांच्या गणवेशावर एका बाजूला हे कॅमेरे बसविण्यात येणार आहे. सुरुवातीला अशा प्रकारे ४० कॅमेरे मध्य रेल्वेस उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यानंतर टप्या टप्याने या कॅमेराची संख्या वाढविण्यात येणार आहेत. या बॉडी कॅमेरामुळे आरपीएफ जवान, अधिकाऱ्यांना गाडीमध्ये गस्त घालताना सहाय्य होणार आहे.

गाड्यांमधील चोऱ्यांसह गाड्यांमध्ये शिरणाऱ्या अनोळखी व्यक्तींवरही लक्ष ठेवण्यास मदत मिळणार आहे. तिकीट तपासनीसांबरोबरही अनेकदा गैरवर्तन होण्याच्या तक्रारी होतात. त्यालाही आळा घालण्यास मदत मिळणार आहे. मध्य रेल्वेच्या आरपीएफकडे ४० बॉडी कॅमेरा घेण्याचा निर्णय़ आरपीएफने घेतला.

त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून कंत्राट देण्यात आले आहे.याकरिता अंदाजे २४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. येत्या एका महिन्यात ४० बॉडी कॅमेरा आरपीएफकडे येतील ,अशी माहिती मध्य रेल्वे आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आय़ुक्त ऋषी शुक्ला यांनी सकाळला दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT