मुंबई

रेल्वेची रहदारी वाढली हॅनकॉक पुलाचे काम पुन्हा रखडले! रेल्वे अधिकारी म्हणतात की,...

संजयघारपुरे - सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः हॅनकॉक पूलाचे गर्डर आले आहेत, पण तरीही पूलाच्या कामास सुरुवात झालेली नाही. रेल्वे ट्रॅकवरुन हा पूल जाणार असल्यामुळे गर्डर टाकण्याच्या कालावधीत रेल्वे सेवेला ब्रेक हवा आहे, पण आता अनलॉक सुरु झाल्याने रेल्वे वाहतूक वाढली आहे आणि त्यास ब्रेक देण्यास रेल्वेची तयारी नाही असेच दिसत आहे. मुंबई महापालिकेने हॅनकॉक पूलाचे गर्डर रविवारी टाकण्याचे ठरवले होते, पण त्या दिवशी त्या परिसरातील ट्रॅकवर पूर्ण मेगाब्लॉक घेण्यास रेल्वे प्रशासनाने नकार दिल्याचे वृत्त आहे. 

रेल्वेच्या सध्या 372 फेऱ्या सुरु आहेत. या सर्व फेऱ्यांचे वेळापत्रक बदलता येणार नाही. त्यांनी महापालिका प्रशासनास रात्री काम करण्याची सूचना केली, पण हे अशक्य असल्याचे महापालिकेने सांगताना हे काम दिवसाच करावे लागेल, असे सांगितले. त्यामुळे 21 जुलैस गर्डर टाकण्याचे काम होऊ शकले नाही.

सँडहर्स्ट रोड आणि भायखळा स्थानका दरम्यान असलेला हॅनकॉक रेल्वे पूल् 2016 च्या जानेवारीत पाडण्यात आला होता.दोन वर्ष या पूलाचे काम उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे थांबले होते. पूलाचे कंत्राट दिलेल्या जे कुमार इन्फ्राप्रोजेक्टसला देण्यात आले होते. त्यांचा उल्लेख रस्ते घोटाळ्यात असल्याने हा आदेश दिल्याचे वृत्तात म्हंटले आहे. अखेर दोन वर्षांनी म्हणजे 2018 च्या फेब्रूवारीत नवे कंत्राट देण्यात आले आणि कामासाठी 2019 चे ऑक्टोबरची मुदत देण्यात आली. मात्र अनेक अडचणीमुळे काम लांबत गेले. या कामास वेग देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते कमलाकर शेणॉय यांनी उच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. रेल्वेची वाहूतक पूर्वीप्रमाणे होत नसताना पूलाचे काम रोखण्याचे कारण काय अशी विचारणा शेणॉय यांनी केली. 

रेल्वेला मात्र ब्लॉक देण्यास नकार दिल्याचा आरोप मान्य नाही. या कामासाठी पहिला ब्लॉक जूनच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्यात आला होता. दुसरा ब्लॉक जूनमध्येच अपेक्षित होता. मात्र याबाबतची विनंती आम्हाला 16 जुलैस करण्यात आली. सर्व लाईनवर तसेच पूर्ण दिवसाचा ब्लॉक हवा आहे. आता त्यांच्या वेळेनुसार ब्लॉक देण्याची तयारी आहे, असे रेल्वेच्या आधिकाऱ्यांनी सांगितले.

-----------------------------------------------

Edited by Tushar Sonawane

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT