Tickets sakal
मुंबई

Railway News: रेल्वेची आठ तासात १२०० फुकट्यांवर कारवाई

३ लाख ४० हजारांचा दंड वसुल करण्यात आला. या कारवाईत ५७ टीसी आणि १३ आरपीएफ जवान कार्यरत होते.

सकाळ डिजिटल टीम

दिवसेंदिवस फुकट्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागाने आता विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार,ठाणे स्थानकावर आठ तासात १ हजार २०८ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून ३ लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहेत.

मुंबईच्या लोकल मध्ये दिवसेंदिवस फुकट्या प्रवाशी वाढत असल्याने रेल्वे विभागासाठी मोठी डोके दुखी ठरत होती. मात्र आता लोकलच्या फुकट्या प्रवाशांना मुसक्या आवरण्यासाठी मध्य रेल्वेने तिकीट तपासणी मोहीम राबविली जाते. मात्र तरीही फुकट्या प्रवाशांची संख्या कमी झालेली नाही.

उपनगरीय लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने त्याचा फायदा घेत अनेकजण विना तिकीट प्रवास करण्यात यशस्वी होत असल्याने त्यांची नाकेबंदी करण्यासाठी रेल्वेने महत्वाच्या आणि गर्दीच्या स्थानकात तपासणी मोहिम सुरु केली आहे. ठाणे स्थानकात शुक्रवारी ५ जानेवारी रोजी राबविलेल्या मोहिमेत दुपारी १ ते रात्री ९ या आठ तासांच्या कालावधीत १ हजार २०८ विना तिकिट प्रवाशांना पकडण्यात आले.त्यांच्याकडून ३ लाख ४० हजारांचा दंड वसुल करण्यात आला. या कारवाईत ५७ टीसी आणि १३ आरपीएफ जवान कार्यरत होते.

ठाणे हे मध्य रेल्वे मार्गावरील महत्वाचे आणि गर्दीचे स्थानक आहे. ठाणे स्थानकातून दिवसाला सुमारे ८ ते ९ लाख प्रवासी प्रवास करतात. ठाणे स्थानकातून सीएसएमटी,कल्याण,कसारा,कर्जत आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल लोकल धावतात. त्यामुळे ठाणे स्थानकात नेहमीच गर्दी असते. त्यामुळे ठाणे स्थानकावर रेल्वेकडूनं विशेष तिकीट तपासणी मोहीम हाती घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चूक नसतानाही प्राचार्यांकडून सर्वांसमोर पाईपने मारहाण, अपमान जिव्हारी; १९ वर्षीय विद्यार्थ्यानं संपवलं आयुष्य

Tom Bruce: सहसदस्य देश केवळ विश्वकरंडकापुरतेच मर्यादित; स्कॉटलंडच्या टॉम ब्रुसची खंत!

Priyank Kharge : 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा दैत्यासारखा, भाजप त्या दैत्याची सावली'; काँग्रेस अध्यक्षांच्या मुलाची जहरी टीका

Kolhapur City :हद्दवाढीशिवाय विकास नाही! मंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्पष्ट संकेत; केंद्राच्या योजनांसाठी कोल्हापूरला विस्तार आवश्यक

Latest Marathi News Live Update : मंत्री नरहरी झिरवळ यांच्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नाराज

SCROLL FOR NEXT