मुंबई

मुसळधार बरसल्यानंतर ठाणे शहरात पावसाची विश्रांती; झाडे उन्मळून पडल्याच्या घटना नाही

राहुल क्षीरसागर


ठाणे -  ठाणे शहरात शुक्रवार पाठोपाठ शनिवारीही पावसाची धुंवाधार बरसणे सुरु होते. शनिवारी सकाळ पासून सुरु झालेल्या पावसाने दुपारनंतर मात्र, विश्रांती घेतली. त्यामुळे मागील दहा तासात 50.54  मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. या दरम्यान, शहरात झाडे उन्मळून पडण्याची एकही तक्रार ठाणे महानगर पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झाली नसल्याची माहिती आपत्ती कक्षाकडून देण्यात आली.

     ठाणे शहरात शुक्रवारी सकाळ पासून पावसाने हजेरी लावली. त्यात सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी देखील सकाळ पासून पावसाने आपली संततधार सुरु ठेवली. सलग दोन दिवसापासून बरसणाऱ्या पावसामुळे वातावरणात कमालीचा गर्व निर्माण झाला होता. शुक्रवारी सकाळी 8.30 ते शनिवार सकाळी 8.30 या 24 तासाच्या कालावधीत 101.02 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. या दरम्यान, ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे 11 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तर, शनिवारी सकाळी 8.30 ते सायंकाळी 6.30 या दहा तासाच्या कालावधीत शहरात 50.54 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. या काळात शहरत कुठलीही घटना घडली नसल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली.

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT